औराद शहाजानी : शेतकर्यांचा सोयाबीन पेरणीवर वाढता प्रभाव व यावर्षी सोयाबीन बियाणे उगवण क्षमतेत नापास बियाणे यांचे वाढलेले प्रमाण परिणामी बियाणांचा तुटवडा पडूनही गावा-गावात सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणी व बीज प्रक्रिया प्रशिक्षण यासंदर्भात १५ ते २० मेदरम्यान सुरू करण्यात आलेल्या जनजागृती मोहिमेचा बुधवारी प्रारंभ करण्यात आला़ राज्यातील शेतकर्यांचा सोयाबीन पीक पेरणीकडे कल वाढला आहे़ यावर्षी पुन्हा यात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ यासाठी लागणारा बियाणांचा पुरवठा महाबीज व इतर खाजगी कंपन्यांकडून केला जातो़ पण यावर्षी मध्य प्रदेशात जास्त पाऊस झाल्यामुळे सोयाबीन बियाणांच्या उगवणक्षमतेचा अहवाल मोठ्या प्रमाणात नकारात्मक आला आहे़ मागणीच्या प्रमाणात पुरवठा कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन शिवाय, शेतकर्यांनी स्वत:जवळचे बियाणे वापरावे, यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यभरात बुधवारपासून ते २० मेदरम्यान प्रत्येक गावात जनजागृती मोहीम कृषी सहायक, पर्यवेक्षक, अधिकारी यांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे़ यासाठी शेतकर्यांच्या घरातच कमी खर्चात साध्या पद्धतीने प्रयोगशाळा स्थापन करून मार्गदर्शन करून बियाणांची प्रत ठरविण्यात येणार आहे़ (वार्ताहर)
राज्यभरात सोयाबीन बियाणे जनजागृती
By admin | Updated: May 15, 2014 00:01 IST