शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जालना शहरात बंदी असलेल्या औषधींची सर्रास विक्री...!

By admin | Updated: November 3, 2016 01:45 IST

जालना :शहरासह जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एका हॉस्पिटलमध्ये गर्भपात प्रकरणी कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी राज्यात बंदी असलेल्या गर्भपातासाठी असलेली औषधी आढळून आली होती.

जालना : शहरासह जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एका हॉस्पिटलमध्ये गर्भपात प्रकरणी कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी राज्यात बंदी असलेल्या गर्भपातासाठी असलेली औषधी आढळून आली होती. त्यानंतर आता पुन्हा या औषधींची विक्री सुरू झाली आहे. राज्यात गर्भपात तसेच इतर काही गोळ्या तसेच औषधींना बंदी आहे. मात्र काही ठिकाणी बाहेर राज्यातील उत्पादित औषधींची छुप्या पद्धतीने विक्री होत असल्याचे चित्र आहे. यामुळे पुन्हा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वी अवैध गर्भपात प्रकरणाचा तपास अद्यापही थंडबस्त्यात अडकला आहे. अशा प्रकारच्या औषधींची विक्री करणाऱ्या मेडिकल दुकानांवरही कारवाई करण्याचा इशारा जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिला होता. मात्र अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही. जालनानंतर घनसावंगीही गर्भपात करणारी औषधी आढळून आली होती. त्यानुषंगानेही तपास सुरू आहे. मात्र यावर ठोस कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आदी राज्यातून काही औषधी छुप्या मार्गाने शहरात येत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे अशा औषधींना राज्यात बंदी आहे. गर्भपात करणाऱ्या औषधींची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता पाटील यांनी सांगितले की, अन्न व औषधी प्रशासनाने कारवाई करावी. त्यांनी जर तपासणी केली तर आम्ही पुढील कारवाई करू. (प्रतिनिधी)