शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसाधारण सभेत मतभेद चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:17 IST

न्यायालयाच्या आदेशानुसार पाणीपुरवठा विभागातील रोजंदारी कर्मचाºयांना फरकाची रक्कम देण्याच्या मुद्यावर सर्वसाधारण सभेत अधिकारी-पदाधिका-यांतील मतभेद चव्हाट्यावर आले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : न्यायालयाच्या आदेशानुसार पाणीपुरवठा विभागातील रोजंदारी कर्मचाºयांना फरकाची रक्कम देण्याच्या मुद्यावर सर्वसाधारण सभेत अधिकारी-पदाधिका-यांतील मतभेद चव्हाट्यावर आले. फरकाच्या रकमेची तरतूद करण्यासाठी निर्णय घेण्याचा आग्रह अधिका-यांचा होता, तर जिल्हा परिषदेवर फरकाचा तब्बल १५ कोटी रुपयांचा बोजा न टाकता ही रक्कम शासनाकडे मागावी, अशी भूमिका पदाधिकारी व सदस्यांची होती. जवळपास तासभर याच विषयावर सभागृहात खडाजंगी झाली.उपाध्यक्ष केशव तायडे यांनी भूमिका घेतली की, न्यायालयाच्या निर्णयाचा आदर आहे. कर्मचा-यांना फरकाची रक्कमही मिळालीच पाहिजे; परंतु यापोटी जिल्हा परिषदेच्या तिजोरीवर १५ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. जर असे झाले तर जिल्ह्यात विकास कामे होणार नाहीत.त्यामुळे न्यायालयाच्या या निर्णयासंबंधी जिल्हा परिषदेने पुनर्विलोकन याचिका दाखल करावी व येत्या १५ दिवसांच्या कालावधीत लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून शासनाकडे फरकाच्या रकमेची मागणी करावी, हा ठराव सभागृहाने संमत करावा. त्यास सभागृहातील उपस्थित सर्व सदस्यांनी एका सुरात अनुमोदन दिले.त्याचवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले की, असा ठराव आपणास घेता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. ३० आॅक्टोबरपूर्वी कर्मचा-यांना फरकाची रक्कम देणे आपणास बंधनकारक आहे.अगोदरच न्यायालयात अवमान याचिका दाखल झालेली आहे. न्यायालयाच्या निर्णयाला गांभीर्याने घ्या. राज्याच्या सचिवांसोबत मी यासंदर्भात अनेक वेळा चर्चा केली. पैशाची मागणीदेखील केली; पण त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, हे कर्मचारी शासनाने भरती केलेले नाहीत.जिल्हा परिषदेने कर्मचा-यांना नियुक्ती दिली आहे. त्यामुळे त्यांच्या वेतनाचा भार तुम्हीच सोसला पाहिजे. न्यायालयातही आपणास जाता येत नाही. त्यामुळे अध्यक्षांनी यासंदर्भात आपला निर्णय जाहीर केला पािहजे, असा आग्रह मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी धरला. तेव्हा उपाध्यक्ष तायडे म्हणाले, आम्ही निर्णय घेतला आहे. त्यावर संतप्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, तुम्ही पीठासीनअधिकारी नाहीत. अध्यक्षांनीच निर्णय दिला पाहिजे. त्यानंतर अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर म्हणाल्या की, न्यायालयाचा अवमान करण्याची आमची भूमिका नाही. जिल्हा परिषदेवर या रकमेचा मोठा भार पडणार आहे, त्यामुळे ३० तारखेच्या आत एकदा शासनाकडे मागणी करून बघू आणि मग पुनर्विलोकन याचिका दाखल करू.शासनाकडे फरकाच्या रकमेची मागणी करण्यासंबंधी, तसेच पुनर्विलोकन याचिकेसंबंधी अविनाश पाटील गलांडे, किशोर बलांडे, मधुकर वालतुरे, रमेश बोरनारे, एल.जी. गायकवाड, किशोर पवार यांनी आपली भूमिका मांडली.