शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

उपचारासाठी दागिने विकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2016 01:25 IST

औरंगाबाद : पतीच्या उपचारासाठी आवश्यक असलेला ‘एमआरआय’ काढण्यासाठी पैसे नसल्याने थेट दागिने विकण्याची वेळ एका स्त्रीवर आल्याची मन

औरंगाबाद : पतीच्या उपचारासाठी आवश्यक असलेला ‘एमआरआय’ काढण्यासाठी पैसे नसल्याने थेट दागिने विकण्याची वेळ एका स्त्रीवर आल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. घाटीतील सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या मदतीसाठी धावून आले; परंतु तरीही पैसे अपुरे पडल्याने दागिने विकण्याची परिस्थिती तिच्यावर आली. बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेली ही महिला पतीच्या उपचारासाठी घाटी रुग्णालयात आलेली आहे. शॉर्टसर्किटमुळे घर जळाल्यानंतर मंदिरात राहण्याची वेळ त्यांच्यावर ओढवली.दुर्दैवाच्या या काळात पतीचा अपघात होऊन डोक्यास मार लागल्याने ते घाटीत आले. या ठिकाणी उपचार सुरू असताना डोक्याचा एमआरआय काढण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला; परंतु हलाखीच्या परिस्थितीमुळे हातात पैसा नसल्याने काय करावे, हे तिला सूचत नव्हते. ही बाब घाटीतील सामाजिक कार्यकर्ते हाफीस साहब आणि किशोर वाघमारे यांना कळाली. त्यांनी १,५०० रुपयांची मदत केली; परंतु ती रक्कम अपुरी पडत होती. त्यामुळे सदर महिलेने कानातील दागिने विकून ‘एमआरआय’ काढला. या घटनेने घाटीत अनेक जण हेलावले. अशी वेळ कोणावरही येता कामा नये, अशीही अपेक्षाही अनेकांनी व्यक्त केली.दारिद्र्यरेषेखालील रुग्णांना १,८०० रुपयांऐवजी ७०० रुपयांमध्ये ‘एमआरआय’ (मॅग्नेटिक रिझनन्स इमेजिंग)ची सुविधा मिळण्यासाठी घाटी रुग्णालयाला मिळालेल्या ५० लाख रुपयांच्या निधीपैकी ४९ लाख ६ हजार ५०० रुपयांचा निधी परत गेला. त्यामुळे गोरगरिबांना पुन्हा ‘एमआरआय’साठी १,८०० रुपये मोजावे लागत आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये मागणी केल्यानंतर हा निधी मिळाला होता; परंतु प्रक्रियेच्या अडथळ्यात अंमलबजावणीस विलंब झाला आणि अवघ्या काही दिवसांत हा निधी परत गेला.