शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

बंधाऱ्यांचे दरवाजे गायब

By admin | Updated: November 19, 2015 00:21 IST

वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील धामणा या नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांचे दरवाजे गायब झाल्याने हजारो लीटर पावसाचे पाणी वाहून गेले आहे

वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील धामणा या नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांचे दरवाजे गायब झाल्याने हजारो लीटर पावसाचे पाणी वाहून गेले आहे. ज्या उद्देशासाठी बंधाऱ्यांची उभारणी केली त्याच उद्देशाला हारताळ फासण्यात आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.विशेष म्हणजे काही वर्षापूर्विच बांधकाम करण्यात आले. होते.कोल्हापुरी बंधारा काही वर्षांपूर्वी बांधला होता त्यावेळी पाणी अडवण्यासाठी दरवाजे बसवले होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून येथील दरवाजेच गायब झाले असून, पावसाचे पाणी वाहून जात आहे.विशेष म्हणजे येथे शेजारीच एक निजामकालीन बंधारा आहे. जुन्या फाडयात पक्के बांधकाम झाले आहे. तो अजुनही तग धरुन आहे. या शेजारीच दुसरा नवा कोल्हापुरी बंधारा असून, त्याला दरवाजेच नसल्यामुळे गुराढोरांनाही पाणी पिणे मुश्कील बनले आहे. शासनाचे यामुळे पैसे वाया गेल्याचे दिसते आहे. पाणी अडले तर त्याचा फायदा परंतु पाणीच अडविले जात नाही तर काय फायदा , असा सवालही शेतकरी करीत आहेत. शेतकऱ्यांनाही याचा काहीच फायदा होत नसल्याचे चित्र आहे. आता नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे पुढे या नदीवरच पदमावती धरण आहे.पंरतु पाणी अडवले जात नसल्याने याचा उपयोग होताना दिसून येत नाही.