शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

छावणी परिसरात गॅस्ट्रोचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 00:53 IST

छावणी परिसरातील २५० पेक्षा अधिक नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचे शनिवारी (दि.११) समोर आल्याने एकच खळबळ उडाली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : छावणी परिसरातील २५० पेक्षा अधिक नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचे शनिवारी (दि.११) समोर आल्याने एकच खळबळ उडाली. एकापोठापाठ रात्री उशिरापर्यंत शेकडो रुग्ण छावणीतील सामान्य रुग्णालयात दाखल झाले. रुग्णांच्या संख्येमुळे थेट जमिनीवर उपचार घेण्याची वेळ अनेकांवर आली. या घटनेला छावणी परिषद प्रशासनाने मात्र गांभीर्याने घेतले नसल्याचे दिसते.छावणीतील विविध भागांतील अनेक नागरिकांना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर अचानक पोटदुखी, जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. पाहता पाहता या त्रासाने संपूर्ण छावणी परिसराला वेढा घातला. लहान मुले, महिला-पुरुष, युवक-युवती, ज्येष्ठ अशा सर्वांना या आजाराने वेढले असल्यामुळे उपचारासाठी नागरिकांनी छावणी सामान्य रुग्णालयात धाव घेतली. येणारा प्रत्येक जण जुलाब, उलट्यांचा त्रास असल्याचे सांगत होता. सकाळपासून सुरू झालेली रुग्णांची गर्दी रात्री उशिरापर्यंत कायम होती. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे डॉक्टर, कर्मचारी वर्गही हैराण झाला होता.रुग्णांना उपचारासाठी सलाईन लावण्याची वेळ येत होती. परंतु जागेअभावी जमिनीवर, बाकड्यांवर आणि एकाच खाटेवर दोघांना सलाईन लावण्याची वेळ आली. रात्री १० वाजेपर्यंत २५० रुग्णांवर उपचार करण्यात आल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांत परिसरातील अनेकांना हा त्रास झाला. खाजगी रुग्णालय आणि घाटी रुग्णालयात अनेकांनी उपचार घेण्यावर भर दिल्याने हा आकडा यापेक्षा अधिक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.सर्वत्र रुग्णच रुग्णछावणी सामान्य रुग्णालयातील रुग्णांची परिस्थिती पाहून नातेवाईकांकडून संताप व्यक्त होत होता. रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेशी जागाही नव्हती. तीन ते चार डॉक्टरांच्या जोरावर मिळेल त्या जागेत रुग्णांवर उपचार सुरू होते. उपचारासाठी जमिनीवर गाद्या टाकण्यात आल्या होत्या. सलाईन लावण्यासाठी दोरीचा आधार घेण्यात आला होता. रुग्णालयात सर्वत्र रुग्णच रुग्ण होते.पाणी बदललेव्हॉल्व्हच्या नादुरुस्तीमुळे मनपाकडून पुरवठा होणारे पाणी बंद झाले आहे. त्यामुळे मिल्ट्रीचे पाणी पुरविण्यात येत आहे. व्हायरल गॅस्ट्रोचे काही रुग्ण समोर आले आहेत. पाण्याचेही नमुने घेण्यात आले आहेत.-संजय गारोल, उपाध्यक्ष, छावणी परिषदरुग्णांवर उपचारदिवसभरात व्हायरल गॅस्ट्रोच्या २५० रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. औषधी, सलाईन यांचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे कोणाचीही गैरसोय झालेली नाही.-डॉ. विनोद धामंदे, एआरएमओ, छावणी सामान्य रुग्णालय.परिषदेचा निष्काळजीपणाछावणी परिषदेची जबाबदारी असताना त्यांच्याकडून निष्काळजीपणा झाला. रुग्णांची संख्या वाढलेली असताना डॉक्टरांची संख्या अपुरी पडत होती. त्यामुळे डॉक्टरांची संख्या वाढविली पाहिजे, असे मयंक पांडे म्हणाले.