शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

छावणी परिसरातील गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येचा आलेख वाढताच;आतापर्यंत ४,३२२ रुग्णांवर उपचार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 14:05 IST

छावणी परिसरातील गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येचा आलेख उंचावतच आहे. रुग्णांची संख्या तब्बल ४ हजार ३२२ वर पोहोचली आहे.

ठळक मुद्देसहाव्या दिवशी गॅस्ट्रोच्या रुग्णांची तुरळक गर्दीछावणी परिषदेत परिस्थिती येतेय नियंत्रणात

औरंगाबाद : छावणी परिसरातील गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येचा आलेख उंचावतच आहे. रुग्णांची संख्या तब्बल ४ हजार ३२२ वर पोहोचली आहे. प्रारंभी १०० जणांना हा आजार असल्याचे समोर आले; परंतु अवघ्या सहा दिवसांत रुग्णसंख्येने चार हजारांचा टप्पा गाठल्याने छावणी परिषदेबरोबर आरोग्य विभागाचे पितळ उघडे पडले आहे.

छावणी सामान्य रुग्णालयात १० नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता गॅस्ट्रोचा पहिला रुग्ण दाखल झाला होता. त्यानंतर काही रुग्ण आले. प्रारंभी अन्नपदार्थ खाण्यातून (फूड पॉयझिनिंग) त्रास झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. ११ नोव्हेंबरच्या सायंकाळी ६.३० वाजेपर्यंतही गॅस्ट्रोच्या रुग्णांची साथ पसरली आहे,अशी पुसटशी कल्पनाही येथील डॉक्टरांना आली नव्हती; परंतु ६.३० वाजेनंतर रुग्णांची संख्या अचानक वाढत गेली. रात्री उशिरापर्यंत रुग्णांच्या रांगा लागल्या. शनिवार आणि त्यात रात्रीची वेळ असल्याने महापालिका, घाटी रुग्णालयाची मदत मागविता आली नाही, अशा परिस्थितीत छावणी सामान्य रु ग्णालयातील डॉक्टर, कर्मचा-यांनी रुग्णसेवेत स्वत:ला झोकून दिले. छावणीतील या परिस्थितीचे वृत्त रविवारी प्रकाशित झाल्यानंतर सर्व आरोग्य यंत्रणांनी मदतीसाठी छावणीत धाव घेतली. त्यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला.

सहा दिवसांत रुग्णसंख्या ४ हजार ३२२ वर पोहोचली, तर १ हजार ४२५ जणांना सलाइन लावण्यात आले. बुधवारी रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे दिसते. खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतरही अनेकांनी या ठिकाणी दाखवून घेण्यावर भर दिला. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे छावणी परिषदेचे उपाध्यक्ष संजय गारोल यांनी सांगितले. रुग्णांसाठी परिश्रम घेणा-या डॉक्टरांची प्रशासनाने दखल घेतली पाहिजे, असे माजी उपाध्यक्ष शेख हनीफ म्हणाले.

जंतूमुळे की, विषाणूमुळे गॅस्ट्रो?पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (एनआयव्ही) चार सदस्यीय पथकाने मंगळवारी रुग्णालयास भेट देऊन रुग्णांच्या विष्टेचे तसेच परिसरातील पाण्याचे नमुने घेऊन रवाना झाली. बुधवारी या संस्थेने रुग्णालयातील डॉक्टरांना काही रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेण्याची सूचना केली. त्यातून गॅस्ट्रोचा प्रसार जंतूमुळे झाला की, विषाणूमुळे झाला,याचा तपास केला जाणार आहे.

कोणीही गंभीर नाही दोन दिवसांपर्यंत एवढे रुग्ण येतील,अशी कल्पना नव्हती; परंतु शनिवारी सायंकाळनंतर रुग्णांच्या रांगाच रांगा लागल्या. या दिवशी रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयातील सर्व डॉक्टर, कर्मचाºयांनी मेहनत घेतली. इतरांकडून मदत मिळेपर्यंत जेवढे शक्य होईल, तेवढे प्रयत्न केले. सुदैवाने ४ हजार ३२२ पैकी कोणीही गंभीर नाही.-डॉ. गीता मालू, आरएमओ, छावणी सामान्य रुग्णालय

उपचारासाठी यांनी घेतले परिश्रमछावणी सामान्य रुग्णालयातील आरएमओ डॉ. गीता मालू, एआरएमओ डॉ. विनोद धामंडे, डॉ. श्रुतिका धामंडे, डॉ. मनोज गवई, डॉ. दानीश देशमुख, डॉ. अमित चोरडिया, नर्सिंग स्टाफ अनिता कुंडे, सतवा राव, मोहंमद बिस्मिला, मोहंमद अयाजुद्दीन, दिलीप पाटणे, मनीषा गावीत, रोहिणी, देवके , मीना बत्तीसे, चंद्रप्रभा सोनवणे, नलिनी सातदिवे, सरोज दौंड, सरिता बिडवे, आकाश गायकवाड, सलीम बेग, अजीम बेग, रजिया बेगम, सायरा बेगम, आरती करपे, शेख फिरोज, सुजात खान, आर्मीचे डॉ. लांबा आणि त्याचे पथक, तसेच घाटी, महापालिका, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पथकाने रुग्णांवरील उपचारासाठी परिश्रम घेतले.