शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

ड्रेनेजमिश्रित पाण्यामुळेच गॅस्ट्रो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:24 IST

छावणी भागातील साडेतीन हजारहून अधिक नागरिकांना ड्रेनेजच्या दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो झाल्याचे समोर आले आहे. महापालिका अधिका-यांनी मंगळवारी दिवसभर संपूर्ण जलवाहिन्यांची पाहणी करून आपला अहवाल सायंकाळी महापौर नंदकुमार घोडेले यांना सादर केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : छावणी भागातील साडेतीन हजारहून अधिक नागरिकांना ड्रेनेजच्या दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो झाल्याचे समोर आले आहे. महापालिका अधिका-यांनी मंगळवारी दिवसभर संपूर्ण जलवाहिन्यांची पाहणी करून आपला अहवाल सायंकाळी महापौर नंदकुमार घोडेले यांना सादर केला. नागरी वसाहतींसाठी टाकण्यात आलेली एक जलवाहिनी चक्क नाल्यातून गेली आहे. नाल्यातील पाणी जलवाहिनीत गेल्याचा निष्कर्ष मनपाच्या चौकशी अधिकाºयांनी काढला आहे.शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी मंगळवारी दिवसभर मनपा आणि छावणी परिषदेच्या जलवाहिन्यांचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला. महापौर बंगल्याच्या दक्षिणेपासून काही अंतरावर मनपाच्या १४०० आणि ७०० मि.मी. व्यासावरून छावणीसाठी दोन स्वतंत्र जोडण्या देण्यात आल्या आहेत. ३०० आणि ३५० मि.मी. व्यासाच्या लाइनद्वारे पुढे छावणीत पाणी जाते. एक लाइन लष्करी भागात तर दुसरी लाइन नागरी वसाहतीसाठी आहे. दरमहा ६० ते ६५ एमएलडी पाणी मनपा छावणी परिषदेला देते. इन्कमटॅक्स कार्यालयापासून आत एका नाल्यातून जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या जलवाहिनीला कोणतीही उंची देण्यात आलेली नाही. चक्क जमिनीवर टाकलेली आहे. दोन दिवस ही लाइन बंद होती. याच दरम्यान, दूषित पाणी जलवाहिनीत जिथे लिकेज असेल तेथून आत गेले असावे, असा अंदाज आहे. नेमके कोणत्या ठिकाणी पाणी आत गेले हे तपासण्यासाठी मंगळवारपासून संपूर्ण जलवाहिनी उघडून पाहण्यात येत आहे. महापालिका यातील दोष शोधून छावणी परिषदेला जलवाहिनीही दुरुस्त करून देणार असल्याचे महापौरांनी नमूद केले. लष्करी भागात गेलेल्या लाइनवरून पाणी पिल्याने कोणालाही गॅस्ट्रो झालेला नाही. फक्त नागरी वसाहतींमध्येच हा गंभीर प्रकार घडला आहे. ज्या ठिकाणी छावणी परिषदेला जलकुंभ आहे, तेथे क्लोरिन तपासण्याचे कोणतेही साधन नाही. क्लोरिन टाकण्याची कोणतीही व्यवस्था नाही. भविष्यात असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून परिषदेला काही सूचना करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.