शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शहरातच बनविले कचरा डेपो

By admin | Updated: August 20, 2016 01:20 IST

औरंगाबाद : ‘माझी सिटी टकाटक’या उपक्रमात महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी शहरात ठिकठिकाणी अनधिकृत कचऱ्याचे डेपो तयार करून तेथे हजारो टन कचरा आणून टाकणे सुरू केले आहे.

औरंगाबाद : ‘माझी सिटी टकाटक’या उपक्रमात महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी शहरात ठिकठिकाणी अनधिकृत कचऱ्याचे डेपो तयार करून तेथे हजारो टन कचरा आणून टाकणे सुरू केले आहे. दुसरीकडे नारेगावला पन्नास टक्के कचरा नेणे बंद झाल्यामुळे महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचल्याचा दावा अधिकारी आयुक्तांसमोर करीत आहेत. अधिकाऱ्यांच्या या चमकोगिरीचा पर्दाफाश मनपा पदाधिकाऱ्यांनी केला.मागील एक वर्षापासून शहरात एका खाजगी कंपनीच्या आर्थिक सहकार्याने ‘माझी सिटी टकाटक’उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात प्रत्येक वॉर्डातील कचरा तेथेच नष्ट करण्याची योजना आखली. अनेक वॉर्डांमध्ये कचरा नष्ट करण्यासाठी जागाच नाही. त्यामुळे मनपातील ‘चतुर’ अधिकाऱ्यांनी भन्नाट शक्कल लढविली. आमखास मैदानाच्या पाठीमागे हजारो टन कचरा मागील वर्षभरापासून आणून टाकण्यात येत आहे. त्याचप्रमाणे औरंगपुरा येथे जिल्हा परिषदेच्या विसर्जन विहिरीजवळही लाखो टन कचरा आणून टाकण्यात आला आहे. या कचऱ्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. हिमायतबाग परिसरातील उद्धवराव पाटील चौकाजवळ मनपा अधिकाऱ्यांनी अनधिकृत कचरा डेपो तयार केला आहे. मागील वर्षभरापासून परिसरातील नागरिकांना कचरा डेपोमुळे मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. अनेकदा नागरिकांनी यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता त्यांना सांगण्यात आले की, आम्ही ओला व सुका कचरा वेगळा करीत आहोत. नंतर हा कचरा उचलून नेण्यात येणार आहे. शुक्रवारी महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, सभागृह नेता राजेंद्र जंजाळ यांनी शहरातील विसर्जन विहिरींची पाहणी केली. औरंगपुऱ्यातील जि. प. मैदानावर विसर्जन विहिरीजवळ कचऱ्याचे मोठमोठे डोंगर पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. हा कचरा इथे कसा आला या प्रश्नावर एकाही अधिकाऱ्याकडे उत्तर नव्हते. मनपाच्या अधिकाऱ्यांचे बिंग फुटताच अनेकांना घाम फुटला होता. यापुढे अनधिकृत ठिकाणी कचरा टाकताना दिसून आल्यास गंभीर कारवाईचा इशारा महापौरांनी दिला.४०० ते ५०० टन कचराशहरातील कचरा नारेगाव येथील डेपोवर नेऊन टाकण्यासाठी महापालिकेला दरवर्षी ३७ कोटी रुपये खर्च येतो. वर्षभरापूर्वी मनपाने ‘माझी सिटी टकाटक’उपक्रम राबवून नारेगावला जाणारा कचरा कमी करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. मनपा अधिकाऱ्यांनी या उपक्रमात मध्यम मार्ग शोधून काढून ठिकठिकाणी अनधिकृत कचरा डेपो तयार केले.