शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांच्या दालनात कचरा

By admin | Updated: June 28, 2017 00:37 IST

बीड : बीड नगर पालिकेचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या दालनात मंगळवारी एमआयएम व काकू-नाना आघाडी नगरसेवकांनी कचरा व घाण टाकली

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड नगर पालिकेचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या दालनात मंगळवारी एमआयएम व काकू-नाना आघाडी नगरसेवकांनी कचरा व घाण टाकली. यामुळे पालिकेतील वाद पुन्हा एकदा चिघळला आहे. स्वच्छतेच्या कामात नगराध्यक्ष खोडा घालत असल्याचा आरोप करीत त्यांनी आंदोलन केले. नगर पालिकेच्या निवडणुकीपासून पालिकेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी होताना दिसत आहेत. नगराध्यक्षांविरोधात काकू-नाना आघाडी वारंवार वेगवेगळ्या मुद्यांवरून आक्रमक होताना दिसून येत आहे. याच आठवड्यात विशेष सभा, आढावा बैठकीच्या कारणावरून पालिकेत वाद झाले होते. मंगळवारी पुन्हा एकदा हा वाद स्वच्छतेच्या कारणावरून उफाळून आला. शहरातील स्वच्छतेच्या कामांसह विकास कामांत नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर खोडा घालतात. तसेच नगराध्यक्ष पद स्वीकारल्यापासून त्यांनी पालिकेत मनमानी सुरू केली आहे. यामुळे पालिकेतील कामे खोळंंबली आहेत. तसेच कर्मचाऱ्यांमध्ये त्यांनी दहशत निर्माण करून आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप आघाडीने केला आहे. दरम्यान, आघाडी व नगराध्यक्ष यांच्या वादात शहरात विकास कामांना‘ब्रेक’ लागला आहे. शहरातील जनताही आता पालिकेतील कारभाराला वैतागली असून तीव्र संताप व्यक्त करीत आहे. परंतु याचे काहीच देणेघेणे आघाडी व नगराध्यक्षांना नसल्याचे दिसते. वेळीच कारभार सुधारला नाही तर नागरिकही आक्रमक होतील, अशी परिस्थिती आता दिसू लागली आहे. या आंदोलनात संदीप क्षीरसागर, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, बांधकाम सभापती अमर नाईकवाडे, पाणीपुरवठा सभापती फारूक पटेल, बाळासाहेब गुंजाळ, युवराज जगताप यांच्यासह आघाडीचे नगरसेवक, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.सभापतींचा पुढाकारनगराध्यक्ष यांच्या दालनात घाण आणि कचरा टाकण्यासाठी खुद्द स्वच्छता सभापती तथा उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांचाच पुढाकार होता. स्वच्छतेसाठी नगराध्यक्ष खोडा घालत असल्याने आपल्याला हे नाईलाजास्तव पाऊल उचलावे लागल्याची प्रतिक्रिया उपनगराध्यक्ष क्षीरसागर यांनी व्यक्त केली.दरम्यान, शिपाई कानडे यांच्या फिर्यादीवरुन १५ ते २० जणांविरुद्ध शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला.