शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत कचराकोंडीच, नव्या जागेसह स्थानिकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 05:23 IST

शहरातील कचराकोंडी सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत.

औरंगाबाद : शहरातील कचराकोंडी सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. रविवारी कन्नड तालुक्यातील पिशोर येथील साखर कारखान्याच्या जागेवर टाकण्यास सुरुवात झाली असताना स्थानिकांसह राजकीय मंडळींनी विरोधाचे हत्यार उपसल्याने महापालिकेने कचरा टाकण्याची मोहीम थांबविली.ऐतिहासिक औरंगाबाद शहरात ‘न भूतो’अशी कचराकोंडी निर्माण झाली आहे. मागील पाच महिन्यांपासून शहरात कचरा पडून आहे. त्यावर उपाय शोधण्यात महापालिका सपशेल अपयशी ठरली आहे. कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कचराकोंडी फोडण्यासाठी शनिवारी पुढाकार घेतला. शहरात पडून असलेला सर्व कचरा कन्नड तालुक्यात नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यासाठी शनिवारीच तालुक्यातील तीन जागांची पाहणी केली. त्यांच्यासोबत मनपाचे अधिकारी, तहसीलदारही होते. मात्र या तिन्ही ठिकाणी कचरा न टाकता रविवारी सकाळी पिशोर येथील बंद पडलेल्या सहकारी साखर कारखान्याच्या जागेवर टाकण्याचा निर्णय घेतला. पालिकेनेही साचलेला कचरा हर्सूल, फुलंब्रीमार्गे सकाळी ११ वाजता पिशोरला पाठवून दिला. पिशोर येथे कचरा पोहोचल्यावर स्वत: हर्षवर्धन जाधव यांनी समोर उभे राहून २० ट्रक कचरा खाली केला. नागरिकांनी विरोध केल्याने पालिकेने ही मोहिम थांबवली़