शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कचऱ्यामुळे पर्यटकही घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 01:03 IST

जागतिक पर्यटनाच्या नकाशावर औरंगाबादचे नाव अग्रभागी आहे, तशी आता या शहराची ओळख कच-याच्या राजधानीचे शहर म्हणूनही झालेली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून शहरभर साचलेले कच-याचे ढीग आणि दुर्गंधीमुळे शहरात येणा-या पर्यटकांवर परिणाम झालेला असून साधारणपणे मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात देश- विदेशातील पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जागतिक पर्यटनाच्या नकाशावर औरंगाबादचे नाव अग्रभागी आहे, तशी आता या शहराची ओळख कच-याच्या राजधानीचे शहर म्हणूनही झालेली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून शहरभर साचलेले कच-याचे ढीग आणि दुर्गंधीमुळे शहरात येणा-या पर्यटकांवर परिणाम झालेला असून साधारणपणे मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात देश- विदेशातील पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे.गेल्या वर्षी जानेवारी ते जूनदरम्यान १७ लाख १२ हजार २०६ देशभरातील पर्यटकांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेट दिली, तर या वर्षात जानेवारी ते जूनदरम्यान १७ लाख ९ हजार ८७१ पर्यटकांनी भेट दिली आहे. यामध्ये जानेवारी ते जून २०१८ दरम्यान औरंगाबादेत येणाºया विदेशी पर्यटकांची संख्या ३७ हजार २८ एवढी आहे.यासंदर्भात टुुरिझम प्रमोटर्स गिल्डचे जसवंत सिंग म्हणाले की, औरंगाबादेत पर्यटक कशाला येतील आणि आम्ही तरी त्यांना तिकडे का पाठवावे, असा प्रश्न दिल्ली येथील इंडियन असोसिएशन आॅफ टूर आॅपरेटर्स या संंस्थेने शहरातील टूर आॅपरेटर्स आणि एजंट यांना केला आहे. मागील महिन्यात इंडियन असोसिएशन आॅफ टूर आॅपरेटर्स या संस्थेचे अध्यक्ष प्रणव सरकार हे शहरात येऊन गेले. तेव्हा ठिकठिकाणी साचलेले कचºयाचे ढीग पाहून त्यांनी अत्यंत दु:ख व्यक्त केले आणि आता कचरा पाहण्यासाठी पर्यटकांना या शहरात पाठवावे का? असा सवाल के ला.शहरातील कचरा पर्यटकांनी पाहू नये म्हणून टूर एजंट लोकांना अनेक दिव्यातून जावे लागत आहे. विदेशी पर्यटकांना किंवा परराज्यांतून शहरात येणाºया पर्यटकांना शहरात फिरावयाचे असेल तर अक्षरश: कचरा लपवत फिरावे लागत आहे. भलेही लांबच्या रस्त्यावरून नेले तरी चालेल, पण जेथे कचरा आहे अशा रस्त्यांवरून पर्यटकांना नेणे टाळा, अशा सक्त सूचना टूर एजंटांनी चालकांना देऊन ठेवल्या आहेत. बीबीका मकबरा, पाणचक्की यासारख्या ठिकाणी पर्यटकांना नेण्यास खूप त्रास होतो. कचरा कि तीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी कुठे ना कुठे तो पर्यटकांच्या नजरेस पडतोच. यामुळे पर्यटक आपल्या शहराची वाईट प्रतिमा घेऊन मायदेशी जात आहेत. याचा परिणाम पुढच्या काळात नक्कीच पाहायला मिळेल. शहराची अशीच अपकीर्ती होत राहिली तर आगामी काळात शहरातील पर्यटनाला कचºयाचा फार मोठा फटका बसेल, अशी चिंता पर्यटन क्षेत्रातील मंडळींनी व्यक्त केली.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नtourismपर्यटन