शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
2
आजोबा, वडील एक्स आर्मी... पतीही मेजर! कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी...
3
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
4
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
5
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
6
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
7
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
8
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
9
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
10
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
13
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
14
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
15
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश
16
Vastu Shastra: हिरव्या रंगाचे पायपुसणे दारात ठेवा, यश, कीर्ती, भाग्योदयाचा ग्रीन सिग्नल मिळवा!
17
Operation Sindoor : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला; पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर
18
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
19
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
20
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम

गरिबांच्या पोटावर पाय, मोठ्यांचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 23:28 IST

सध्या जिल्ह्यातील विविध ठिकाणचे अतिक्रमण काढण्याची धडक मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. वसमतनंतर हिंगोलीतही अचानक रामलीला मैदान मोकळे केले. शहरातही पथकांनी अतिक्रमण काढायला सांगितले काहींनी काढले. काहींनी धीर धरला. मात्र हे सर्व गरिबांच्याच नशिबी आले ज्यांनी अतिक्रमित जागेवर लाखोंचे इमले उभे केले, त्यांचे काय? हा सवाल सार्वत्रिकपणे ऐकायला मिळत आहे.

ठळक मुद्दे रामलीला मैदान मोकळे केले.फेरीवाल्यांसाठी पर्यायी अशी जागाच शहरात कुठे नाहीमोठ्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी कर्तव्यकठोरांच्या हाताला काय लकवा मारला काय,

हिंगोली : सध्या जिल्ह्यातील विविध ठिकाणचे अतिक्रमण काढण्याची धडक मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. वसमतनंतर हिंगोलीतही अचानक रामलीला मैदान मोकळे केले. शहरातही पथकांनी अतिक्रमण काढायला सांगितले काहींनी काढले. काहींनी धीर धरला. मात्र हे सर्व गरिबांच्याच नशिबी आले ज्यांनी अतिक्रमित जागेवर लाखोंचे इमले उभे केले, त्यांचे काय? हा सवाल सार्वत्रिकपणे ऐकायला मिळत आहे.हिंगोलीत मागील दीड-दोन वर्षांत अतिक्रमण हटाव मोहिमेचे वारे दर तीन-चार महिन्यांनी वाहू लागते. अतिक्रमणे काढताच ती दहा-पंधरा दिवसांनी पाय पसरतात. फेरीवाल्यांनी एकाच जागी ठाण मांडल्याने हा प्रश्न तसाही चिघळलेला आहे. दर चार-पाच दिवसांनी काहीतरी वाद होतात. कुणीतरी तक्रार करते. ती मनावर घेण्यासाठी एखाद्या महिन्याचा काळ उलटतो अन् पुन्हा अतिक्रमण हटावचा बिगूल वाजतो. मात्र आता वारंवार होणाºया या प्रकाराने किरकोळ विक्रेते वैतागले आहेत. शिवाय अतिक्रमण हटले की, जणू हक्काची जागा समजून ज्या रामलीला मैदानावर विक्रेते जायचे तेही आता मोकळे केले. शिवाय तेथे जाण्याचे रस्तेही प्रशासनाने खड्डे खोदून अवघड करून टाकले आहेत. त्यामुळे तेथे आता वाहनधारकांनाही ताबा करणे सोपे राहिले नाही.एकीकडे अतिक्रमणे काढली अन् दुसरीकडे फेरीवाल्यांसाठी पर्यायी अशी जागाच शहरात कुठे नाही. दिलीच तर तेही रामलीला मैदान व गांधी चौकाच्या पलिकडे जातील, असे वाटत नाही. मात्र आता उपासमारीची वेळ येत असल्याने ही मंडळी बड्यांच्या अतिक्रमणाकडे बोट दाखवत आहे. अधिकारी बदलीच्या भीतीने या अतिक्रमणांना अभय देतात का, असा सवाल केला जात आहे. मात्र एकजूटपणे त्याविरुद्ध मैदानात उतरण्याची तयारी कोणाचीच नाही. काही टपरीवाले वैयक्तिक निवेदने देऊन हैराण आहेत. अशा एकेका आवाजाला दाबणे शक्य आहे. मात्र एकीचे बळ वापरायचे तर प्रशासन सांगेल तसे वागायची भीती आहे. त्यामुळे या प्रकरणाला शांत होऊ देण्याचा काळच औषध ठरविण्याचा फंडा वापरला जात आहे. परंतु मोठ्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी कर्तव्यकठोरांच्या हाताला काय लकवा मारला काय, ही डोळ्यात अंजन घालणारी झणझणीत प्रतिक्रिया प्रशासनाच्या कानी पडावी म्हणून माध्यमांचे उंबरे झिजवले जात आहेत. परंतु प्रशासनाची भूमिका मात्र दोलायमान आहे, हेही तेवढेच खरे.