हिंगोली : ‘लोकमत’ बाल विकासमंच तर्फे घेण्यात आलेल्या ‘गणपती सजावट’ स्पर्धेचे बुधवारी बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष विलास गोरे, प्रवीण भट्ट, राजेश बगडिया यांची उपस्थिती होती. २९ आॅगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात आलेल्या या स्पर्धेत नाव नोंदणी करण्यात आली आणि ४ सप्टेंबर रोजी त्यांच्या घरी जाऊन फोटो काढण्यात आले. त्यात प्रथम पारितोषिक १ हजार १ रोख रकमेचे मानकरी ठरले बालिका गणेश मंडळ. यामध्ये बालविकास मंच सदस्या मधुबाला जगदीश साहू, माधुरी भगवान गायकवाड, पूनम गणेश काळे, अंजली अशोक गवळी, राधिका जगदीश साहू, अरूधंती गंगाधर नर्सीकर यांचा समावेश आहे. तर दुसरे पारितोषिक ७०१ रुपयांचे श्रेयश डिगांबर डोंगरे, तिसरे पारितोषिक ५०१ रुपयांचे प्रसाद संतोष टाले, उत्तेजनार्थ ४०१ रुपयांचे वैष्णवी चंद्रकांत पाटील, सुजल संतोष चौधरी यांच्या गणपतीने पटकाविले. या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व श्री सार्वजनिक गणेश मंडळ यांनी स्वीकारले होते.(जिल्हा प्रतिनिधी)
गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
By admin | Updated: September 11, 2014 00:00 IST