शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:02 IST

औरंंगाबाद : जालना येथील कोविड केअर सेंटरमधून रेमडेसिविर इंजेक्शन आणून त्याची औरंगाबादेत चढ्या दराने विक्री करणाऱ्या ७ जणांच्या टोळीला ...

औरंंगाबाद : जालना येथील कोविड केअर सेंटरमधून रेमडेसिविर इंजेक्शन आणून त्याची औरंगाबादेत चढ्या दराने विक्री करणाऱ्या ७ जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीकडून पोलिसांनी पाच रेमडेसिविर इंजेक्शन, ६ मोबाइल, एक कार असा एकूण ५ लाख ६४ हजार ५८७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दिनेश कान्हू नवगिरे (वय २८, रा. जयभीमनगर, घाटी रोड), साईनाथ अण्णा वाहूळ (वय ३२, रा. रामनगर), रवि रोहिदास डोंगरे (रा. भाग्यनगर) तसेच संदीप सुखदेव रगडे (वय ३२), प्रवीण शिवनाथ बोर्डे (वय २७), नरेंद्र मुरलीधर साबळे (वय ३३) आणि अफरोज खान इकबाल खान (हे सर्व रा. बदनापूर, जि. जालना) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

झाले असे की, रेमडेसिविर इंजेक्शन चढ्या दराने विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी या इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करणारी टोळी गजाआड करण्यासाठी सहायक निरीक्षक मनोज शिंदे, अजबसिंग जारवाल, अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक राजगोपाल बजाज, पोलीस अंमलदार संतोष सोनवणे, चंद्रकांत गवळी, शिवाजी झिने, राजेंद्र साळुंके, विशाल पाटील आदींचे पथक तयार करून सापळा रचला.

जमादार विशाल पाटील यांनी बनावट ग्राहक बनून टोळीचा मुख्य सूत्रधार दिनेश नवगिरे यास रेमडेसिविर इंजेक्शनसाठी फोन केला. व्यवहार ठरल्यानुसार पाटील यांनी दिनेशच्या अकाउंटवर फोन पेद्वारे २० हजार रुपये टाकले. तेव्हा दिनेशने इंजेक्शन घेण्यासाठी पाटील यांना घाटी हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहाजवळील रिक्षा स्थानकाजवळ बोलावले. तेथे अगोदरच गुन्हे शाखेचे पथक दबा धरून बसले होते. इंजेक्शन देताना या पथकाने दिनेशला पकडले.

चौकशीदरम्यान दिनेश नवगिरे याने सदरील रेमडेसिविर इंजेक्शन जालना येथील कोविड केअर सेंटरमधील कर्मचारी आणि मित्रांच्या मदतीने जास्तीच्या दराने विक्री करण्यासाठी आणले असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या सर्व साथीदारांना अटक करून त्यांच्या ताब्यातून ५ रेमडेसिविर इंजेक्शन, ६ मोबाइल, कार (एमएच २४- एम- ५६) असा एकूण ५ लाख ६४ हजार ५८७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. अटकेत असलेल्या टोळीविरुद्ध अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक राजगोपाल बजाज यांनी दिलेल्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौकट.......

कुंपणच शेत खाते तेव्हा...

या टोळीचा मुख्य सूत्रधार दिनेश नवगिरे हा त्याचे जालना कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या मित्रांकडून रेमडेसिविर इंजेक्शन हस्तगत करायचा. त्याचे मित्र आरोग्य प्रशासनाचा विश्वासघात करून ही इंजेक्शन्स काळ्याबाजारात विक्रीसाठी दिनेशकडे देत होते. सध्या या इंजेक्शनचा तुटवडा असल्यामुळे रुग्णांचे नातेवाईकही दिनेशकडून जास्त दराने हे इंजेक्शन घ्यायचे. त्याच्याकडे विविध कंपन्यांचे विनाप्रिस्क्रिप्शनची ५ इंजेक्शन्स पोलिसांना आढळून आली.