शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Visarjan: वॉच टॉवरवरून लक्ष ते स्पेशल स्कॉड; अडिज हजार पोलिसांचा औरंगाबादेत कडेकोट बंदोबस्त

By राम शिनगारे | Updated: September 9, 2022 19:48 IST

पोलिसांचे पथक विसर्जन स्थळी घेत आहे विशेष काळजी

औरंगाबाद : कोरोनाच्या महाकाय संकटानंतर ११ दिवस जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. आज अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तवर गणेश मूर्तिंचे विसर्जन करण्यात येते आहे. अतिशय जल्लोषात मिरवणूक निघाल्या असुन पोलिसांनी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मिरवणुक मार्गासह गणेश मूर्तिंचे विसर्जन केल्या जाणाऱ्या विहिरी, परिसरातील तलावावर पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे. गणेश मूर्तीचे पाण्यात विसर्जन करण्यासाठी युवक आतमध्ये उतरण्याची शक्यता गृहीत धरून हा बंदोबस्त लावला आहे.

शहर पोलिसातील वरिष्ठ अधिकऱ्यांसह १७६ अधिकारी आणि २ हजार ५४६ कर्मचारी असा तगडा बंदोबस्त विविध ठिकाणी तैनात केला आहे. यात सर्व सार्वजनिक गणेश मंडळांच्या मुख्य विसर्जन मिरवणुक, विसर्जन विहीर, मिरवणूक मार्ग, धार्मिक स्थळे आदी ठिकाणी पोलिसांचे पथक तैनात केल्याचे दिसून आले. आहे. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता,  उपायुक्त उज्ज्वला वनकर, दीपक गिरहे, अपर्णा गीते यांच्यासह सहायक पोलीस आयुक्त बंदोबस्तावर  देखरेख ठेवत आहेत.

या भागात निघाल्या मिरवणुका११ दिवसाच्या उत्सवानंतर लाडक्या गणपती बाप्पा निरोप देण्यात येत आहेत. त्यासाठी सर्वत्र जंगी मिरवणुका निघल्या आहेत.  जुने शहरातील मुख्य मिरवाणुकीसह सिडको हडको, मुकुंदवाडी, शिवाजीनगर, गारखेडा, जवाहर नगर, पुंडलिकनगर, सातारा परिसर, नक्षत्रवाडी, वाळूज, वाळूज महानगर, दौलताबाद, छावणी, हर्सूल आदी भागात मिरवणुका काढण्यात आल्या आहेत. या सर्व ठिकाणी तगड़ा बंदोबस्त असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश अघाव यांनी दिली. 

धक्का स्कॉड  तत्परविशेष शाखा १ अधिकारी, १५ कर्मचारी आणि गुन्हे शाखेचे १ अधिकारी, २० कर्मचारी असे सात पथके मिरवणूक पुढे नेण्यासाठी साध्या वेशात मिरवणुकीत तैनात केले आहेत. त्यामुळे मिरवणुक कोठेही थांबत नसल्याचे दिसून आले.

शहराच्या इंट्री पॉइंटवर तपासणीशहराच्या हद्दीवर सहा ठिकाणी चेक पोस्टवर तपासणी करण्यात येत आहे. यात हर्सूल नाका, जालना नाका, बीड नाका, पैठण रोड नाका, दौलताबाद टी पॉईंट आणि वाळूज नाका येथे वाहतूक शाखेचे ३६ कर्मचारी ळ वाहनांची तपासणी करीत आहेत.

वॉच टॉवरवरुन देखरेखगर्दीच्या पाच ठिकाणी मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी शहागंज, सिटी चौक, बारभाई ताजिया, जिजामाता चौक एन-९, टीव्ही सेंटर येथे वॉच टॉवरच्या माध्यमातून निगरानी करण्यात येत आहे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवAurangabadऔरंगाबाद