शिरीष शिंदे , बीडगणेश उत्सवादरम्यान भाविकांना वाटप होणाऱ्या अन्न पदार्थातून विषबाधेसारखी अप्रिय घटना होऊ नये याची खबरदारी म्हणून अन्न व औषध प्रशासन विभागाने अन्न पदार्थासाठीचा परवाना घेणे आवश्यक असल्याचे परिपत्रक काढले आहे. हे परिपत्रक पोलीस अधीक्षक व धर्मादाय आयुक्त कार्यालयास पाठविण्यात आले आहे.अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ व त्यातील नियमन २०११ नुसार गणेश मंडळांना महाप्रसाद वाटप प्रसंगी घ्यावयाच्या काळजीची सूचना दिल्या गेली आहे. ५ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होणार आहे. तत्पूर्वी गणेश मंडळे धर्मादाय आयुक्त यांच्याकडून परवानगी घेतील. त्यामुळे सदर कार्यालयास अन्न व औषध विभागाने परिपत्रक पाठवून गणेश मंडळांना परवाना घेण्याबाबत सूचित करण्यात येणार आहे. कोणत्याही ठिकाणी अन्नपदार्थ बनविताना त्यासाठीची काळजी व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच नोंदणी करणे बंधनकारक आहे. अनेक गणेश मंडळे भंडारा / महाप्रसादाचे वाटप करतात. त्यामुळे त्यांना अन्न पदार्थ बनविताना घ्यावयाची काळजी सूचित करण्यात आली आहे.वांगी (ता. बीड) येथे महाप्रसादातून विषबाधा झाल्याने ५०० भाविकांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना या संदर्भात सूचना दिल्या.अन्न पदार्थ हाताळणाऱ्या व्यक्तीने नाक, कान, डोळे, केस खाजवणे टाळावे, संसर्गजन्य आजार असणाऱ्या व्यक्तीने अन्नपदार्थ बनवू नये. अन्नपदार्थ बनविणाऱ्या व्यक्तीचे कपडे स्वच्छ असावेत. शिळा प्रसाद भक्तांना वाटप करू नये. अन्नपदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खाद्यतेलाचा पुनर्वापर करू नये. पिण्याचे पाणी निर्जुंतूक करूनच वापरावे. प्रसाद बनविणाऱ्या व्यक्तीने हातमोजे, अॅप्रॉन घालावा. त्यांनी वैयक्तिक स्वच्छतेसह सर्व नियमांची अंमलबजावणी करावी. कच्च्या अन्नपदार्थांची खरेदी बिले बाळगावीत. तसेच ते पदार्थ परवानाधारक दुकानामधून खरेदी करावेत.
गणेश मंडळांना अन्न परवाना आवश्यक
By admin | Updated: September 1, 2016 01:07 IST