शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

होर्डिंग कंत्राटाचा गेम प्लान फसला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:40 IST

शहरात महापालिकेच्या मालकीचे दोनशेपेक्षा अधिक होर्डिंग आहेत. होर्डिंगवर विविध जाहिराती लावण्यासाठी खाजगी कंपन्या दरवर्षी कोट्यवधी रुपये मोजतात. सर्व होर्डिंग २० वर्षांसाठी एका खाजगी संस्थेला देण्याचा ठराव शुक्रवारी सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला. फक्त २५ लाख रुपये प्रतिवर्षप्रमाणे होर्डिंग देण्याचा हा ठराव होता, हे विशेष.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात महापालिकेच्या मालकीचे दोनशेपेक्षा अधिक होर्डिंग आहेत. होर्डिंगवर विविध जाहिराती लावण्यासाठी खाजगी कंपन्या दरवर्षी कोट्यवधी रुपये मोजतात. सर्व होर्डिंग २० वर्षांसाठी एका खाजगी संस्थेला देण्याचा ठराव शुक्रवारी सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला. फक्त २५ लाख रुपये प्रतिवर्षप्रमाणे होर्डिंग देण्याचा हा ठराव होता, हे विशेष.शहरातील होर्डिंग खाजगी संस्थेला देण्याचा अधिकार फक्त स्थायी समितीला आहे. सप्टेंबर २०१७ मध्ये अवघ्या २५ लाख रुपयांमध्ये खाजगी संस्थेला ठराव देण्याचा ठराव चक्क सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला. तत्कालीन महापौर बापू घडमोडे यांनी १६ स्पटेंबर रोजी ‘ऐनवेळीत’ या ठरावाला मंजुरी देऊन टाकली.महापौरांच्या या कृतीमुळे स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी थेट प्रशासनाला पत्र लिहून हा ठराव सर्वसाधारण सभेत कसा ठेवण्यात आला, असा प्रश्न उपस्थित केला. प्रशासनालाही आपली चूक लक्षात आली. शुक्रवारी सकाळी परत एकदा ठराव स्थायीसमोर ठेवण्यात आला.मोकळ्या जागा, इमारती, रस्त्यांवर दिशाफलक उभारणे, बसस्थानक विकसित करणे यातून कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा असताना प्रशासनाने केवळ २५ लाख रुपयांचा प्रस्ताव ठेवला. फ्युचर मीडिया अ‍ॅडव्हर्टायझिंगचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला होता. नगरसेवक राज वानखेडे, राजू वैद्य, कीर्ती शिंदे, सिद्धांत शिरसाट, राखी देसरडा, सय्यद मतीन यांनी प्रस्तावाला कडाडून विरोध केला. मालमत्ता अधिकारी वामन कांबळे यांनी खुलासा केला. मात्र, सदस्यांचे समाधान झाले नाही. सदस्यांच्या विरोधामुळे सभापतींनी प्रस्ताव स्थगित करीत नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश प्रशासनाला दिले.होर्डिंगच्या माध्यमातून महापालिकेला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. अवघ्या २५ लाख रुपयांमध्ये कोट्यवधींचे काम कोणी दिले, प्रशासनातील झारीचे शुक्राचार्य कोण, असाही मुद्या या निमित्ताने उपस्थित होत आहे. महापालिकेच्या तिजोरीचा गळा घोटणाºयांवर प्रशासन कोणती कारवाई करणार आहे, असा प्रश्न नगरसेवक उपस्थित करीत आहेत.