लातूर : एमआयडीसी परिसरातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा धाड टाकली. या धाडीत १३ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल असा एकूण २ लाख ९६ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक गोवर्धन भुमे यांच्या पथकाने एमआयडीसी परिसरात सोमवारी रात्री उशिरा धाड टाकली. या धाडीत दगडू गोविंद पाटील, गजानन नारायण लाटेकर, सतीश शिवाजी डोंगरे, अभिमन्यू हरिदास इंगळे, अभिषेक देविदास सूर्यवंशी, साईनाथ मारोती मिरजे, इरफान महेबुबखान पठाण, प्रदीप बालाजी घुले, शिवशंकर हणमंत वाकुडे, शेख पाशा वाजीद, पद्माकर पुजारी, शंकर गुरुदास ढोणे आदींना जुगार खेळत असताना भुमे यांच्या पथकाने रंगेहात पकडले. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून रोख ६५ हजार ८०० रुपये, १३ मोबाईल, मोटारसायकली असा एकूण २ लाख ९६ हजारांचा ऐवज जप्त केला. या सर्वांच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात पोलीस निरीक्षक भुमे यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार ४, ५ मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असल्याचे एमआयडीसी पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.
एमआयडीसी परिसरात जुगार अड्ड्यावर धाड; १३ जण अटकेत
By admin | Updated: March 22, 2017 00:18 IST