शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता प्राप्त करणे हे आंबेडकरी चळवळीचे ध्येय नाही

By admin | Updated: February 23, 2016 00:40 IST

जालना : आंबेडकरी चळवळीने या देशात परिवर्तनाचा नवा पायंडा निर्माण केला असून, केवळ सत्ता प्राप्त करणे हे चळवळीचे कधीच सूत्र ठेवले नाही.

जालना : आंबेडकरी चळवळीने या देशात परिवर्तनाचा नवा पायंडा निर्माण केला असून, केवळ सत्ता प्राप्त करणे हे चळवळीचे कधीच सूत्र ठेवले नाही. तर या देशात लोकशाही रूजली पाहिजे, टिकली पाहिजे, उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले तरी चालेल. परंतु लोकशाही बळकटीकरण झाले पाहिजे, असे प्रतिपादन प्रख्यात विचारवंत प्रा. अविनाश डोळस यांनी येथे केले. संत शिरोमणी गुरू रविदास व्याख्यानमालेत शेवटच्या पुष्पात ते बोलत होते. विचारपीठावर अध्यक्ष म्हणून आ. अर्जुन खोतकर तर प्रमुख पाहुणे म्हणून कॉ. अण्णा सावंत, राजेश राऊत, संतोष साबने, प्रकाश नारायणकर यांची होती.प्रा. डोळस म्हणाले की, या देशात आंबेडकरी चळवळीचे सूत्र आपण लक्षात घेतले पाहिजे, ज्या चळवळीने स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायासाठी सातत्याने संघर्ष केला. हा संघर्ष पाण्यासाठी, कधी माणुसकीसाठी, कधी समतेसाठीचा संघर्ष आहे. तो कधीच एका जाती, जमातींसाठीचा संघर्ष नाही. या चळवळीने कधीच प्रतिक्रियावादी न होता समाजाला प्रतिक्रिया आपल्या कृती आणि उक्तीतून द्यायला भाग पाडले आहे. अगदी अप्रशिक्षीत समाज त्याकाळी आपल्यासोबत येऊन डॉ. बाबासाहेबांनी हा सर्वबदल केला. परंतु आज समाजामध्ये बुद्धीजिवी वर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. हा बुद्धीजीवी वर्ग समाजाला योग्य ती दिशा देऊ शकतो. मात्र, तसे घडताना दिसून येत नाहंी. हा बुद्धीजीवी वर्ग स्वत:मध्येच मग्न झाला आहे. बुद्धीजीवी वर्गाने आज सजग होण्याची वेळ आली आहे. या वेळी समाजातील कार्यकर्त्यांचा चर्मकार युवा भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वर्षी हा पुरस्कार गजानन इंगळे, बन्सीलाल ढवळे, जालिंदर वाघमारे, महंमद इरफान, महंमद इस्माईल बागवान, शंकर शिरगुळे या हा पुरस्कार दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदा पवार, प्रा. टी. आर. जगताप यांनी केले. आभार गणेश चांदोडे यांनी व्यक्त केले. या प्रसंगी अ‍ॅड. बी. एम. साळवे, सुधाकर निकाळजे, डॉ. विजय कुमठेकर, प्रा. बसवराज कोरे, विजय पंडित, बी. के. शिंदे, बी. आर. भालशंकर, दिपक इंगळे, बबनराव रत्नपारखे, संजय हेरकर आदी उपस्थित होते.