शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गड्डी गँगच्या सदस्यांनी उडवले पैसे बारबालांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:50 IST

कागदांची बंडले सोपवून सामान्यांना गंडविणा-या गड्डी गँगच्या म्होरक्याला सायबर गुन्हे सेलच्या पथकाने मुंबईतून पकडून आणले. गड्डी गँग ही अय्याशी गँग म्हणून मुंबईत ओळखली जाते.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कागदांची बंडले सोपवून सामान्यांना गंडविणा-या गड्डी गँगच्या म्होरक्याला सायबर गुन्हे सेलच्या पथकाने मुंबईतून पकडून आणले. गड्डी गँग ही अय्याशी गँग म्हणून मुंबईत ओळखली जाते. ते फसवणूक आणि लुटमार करून आलेले पैसे बारबालांवर उडवत असल्याचे पोलीस तपासात समोर आले. विशेष म्हणजे ते नेहमी लॉजवर मुक्काम करीत आणि हॉटेलमध्येच जेवण करीत.याविषयी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, उस्मानपुरा भागात एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणाला तुझा मुलगा आमच्या ताब्यात आहे, असे धमकावून त्याने काढलेले २० हजार रुपये हिसकावले. यानंतर त्याचे एटीएम कार्ड हिसकावून घेत आणि पासवर्ड विचारून आरोपींनी परस्पर आणखी तेवढीच रक्कम काढली होती. याप्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. तारभवनसमोरील एसबीआय बँकेसमोर घडलेल्या दुस-या एका घटनेत आरोपींनी एका जणाला गाठून त्याच्याकडील चोरीची मोठी रक्कम तुमच्या खात्यावर टाका, त्यातून दहा हजार रुपये कमिशन म्हणून घ्या आणि आम्हाला एटीएम कार्ड व पासवर्ड द्या, आम्ही आमची रक्कम काढून तुमचे एटीएम कार्ड परत करतो, अशी थाप मारली. यावेळी तक्रारदार यांच्या हातात पैशांच्या गड्डीसारख्या दिसणाºया बंडलाची कॅरीबॅग सोपवून आरोपी एटीएम कार्डसह पसार झाले होते. त्यांनी नंतर त्या एटीएम कार्डचा वापर करून १ लाख ४८ हजार रुपयांचा माल परस्पर खरेदी केला. आरोपींनी दिलेल्या कॅरिबॅगमध्ये नोटा नव्हे, तर कोºया कागदांची बंडले होती. प्रत्येक बंडलाच्या वरची आणि खालची नोट खरी होती. या गँगचा म्होरक्या सागर अंभोरे यास मुंबईतील उल्हासनगर भागातून पोलिसांनी पकडले. आरोपी सीसीटीव्हीत कैद झाल्याने त्यांची छायाचित्रे पोलिसांना मिळाली होती.