शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

जी-पीएटीच्या परीक्षार्थींना मिळणार प्रत्येकी दहा वाढीव गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:41 IST

आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) यांनी यावर्षी देशपातळीवर घेतलेल्या ग्रॅज्युएट फार्मसी अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट (जी-पीएटी) या पूर्व परीक्षेमध्ये चुकीच्या दोन प्रश्नांची उत्तरे दुरुस्त करून दहा गुणांची वाढ केल्याचे शपथपत्र औरंगाबाद खंडपीठात सादर केले़

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) यांनी यावर्षी देशपातळीवर घेतलेल्या ग्रॅज्युएट फार्मसी अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट (जी-पीएटी) या पूर्व परीक्षेमध्ये चुकीच्या दोन प्रश्नांची उत्तरे दुरुस्त करून दहा गुणांची वाढ केल्याचे शपथपत्र औरंगाबाद खंडपीठात सादर केले़या निर्णयामुळे जी-पीएटी परीक्षा देणाºया देशभरातील सुमारे एक हजार पाचशे विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार असून, त्यांना १५ हजारांचे विद्यावेतनदेखील मिळणार आहे़ न्या़ आऱ एम़ बोर्डे आणि न्या़ ए़ एम़ ढवळे यांच्या खंडपीठासमोर प्रकरणाची सुनावणी झाली असता दाखल झालेल्या शपथपत्रावरून खंडपीठाने याचिका निकाली काढली़पदव्युत्तर औषधनिर्माणशास्त्र (एम़ फार्मसी) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) यांनी ग्रॅज्युएट फार्मसी अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट (जी-पीएटी) ही आॅनलाइन परीक्षा केंद्र शासनाच्या मानवसंसाधन मंत्रालयामार्फ त (एचआरडी) २८ व २९ जानेवारी रोजी घेण्यात आली होती़ नंतर परीक्षेची उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली़ या उत्तरतालिकेत ८ प्रश्नांची उत्तरे चुकीची दिली गेली़ त्यामुळे याचिकाकर्त्याने याबाबत केंद्र्र शासनाकडे तक्रार नोंदविली, तसेच चुकीची उत्तरे दिल्याबाबत पुस्तकांचे पुरावे दाखल के ले; मात्र शासनाने तक्रारीवर काहीच कारवाई केली नाही़ या नाराजीने नांदेड येथील दयानंद संभाजीराव मांजरमकर यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली़ याचिकेत, तज्ज्ञांचे विशेष पथक नेमावे, अशी विनंती के ली होती़ त्यानुसार तज्ज्ञांची समिती नेमून तपासणी केली असता दोन प्रश्नांची उत्तरे चुकीची असल्याचे समोर आले़ त्या चुकीच्या प्रश्नांचे दहा गुण विद्यार्थ्यांना वाढवून दिल्याचे शपथपत्र एआयसीटीईने खंडपीठात सादर केले़ याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी काम पाहिले, तर एआयसीटीईच्या वतीने अ‍ॅड. श्रीकांत अदवंत यांनी काम पाहिले़