शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणीय बदलामुळे भविष्य खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:44 IST

वातावरणीय बदलामुळे मागील काही वर्षांत पर्जन्यमानात मोठ्या प्रमाणात फेरफार होत असल्याचे दिसून आले आहे. नुकताच पार पडलेला पावसाळाही याला अपवाद नाही.

अनुराग पोवळे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : वातावरणीय बदलामुळे मागील काही वर्षांत पर्जन्यमानात मोठ्या प्रमाणात फेरफार होत असल्याचे दिसून आले आहे. नुकताच पार पडलेला पावसाळाही याला अपवाद नाही. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ९५५.५५ मिमी असताना या पावसाळ्यात जवळपास निम्मा म्हणजेच ६६ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने पर्यावरणपूरक धोरणांची अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे. हवामान विभागाने नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात नांदेड जिल्ह्यातील तापमान पुढील काही वर्षांत वाढत जाणार असून २२ ते २६ ठिकाणी सातत्याने अतिवृष्टीचा धोका वाढणार आहे.जिल्ह्यात यंदा ६६ टक्के सरासरी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस पडणाºया किनवट आणि माहूर तालुक्यात मात्र यंदा सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झाला नाही. जिल्ह्यात परतीचा पाऊस चांगला झाल्याने ५० टक्क्यांहून अधिक सरासरी पावसाने गाठली असली तरी हा पाऊस समप्रमाणात झालेला नाही. जिल्ह्यात सर्वाधिक ९८.६३ टक्के पाऊस मुदखेड तालुक्यात तर त्या खालोखाल ९२.३० टक्के पाऊस हा नांदेड तालुक्यात पडला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणारे किनवट आणि माहूर हे दोन तालुके आहेत. या दोन तालुक्यांची वार्षिक सरासरी प्रत्येकी १२४० मिमी इतकी आहे; पण या दोन्ही तालुक्यांमध्ये वार्षिक सरासरीच्या ५० टक्क्यांहून कमीच पाऊस झाला आहे. किनवट तालुक्यात ६०१.९८ मिमी म्हणजेच ४८.५५ टक्के तर माहूर तालुक्यात ५००.९२ मिमी पाऊस झाला. या पावसाची सरासरी केवळ ४० टक्के भरली आहे. देगलूर तालुक्यातही वार्षिक सरासरीच्या केवळ ५१.३० टक्के पाऊस झाला आहे. या तालुक्यात वार्षिक ९००.३० मिमी सरासरीपैकी ४६१.८२ मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात बºयापैकी पाऊस झालेल्या तालुक्यांमध्ये अर्धापूर-७८.८४ टक्के, भोकर-७०.७३, उमरी-६७.३१, कंधार-७५.५४, लोहा-७३.४४, हदगाव-६६.३१, हिमायतनगर-५५.९२, बिलोली-६४.०८, धर्माबाद-६१.५६, नायगाव-६६.४ टक्के आणि मुखेड तालुक्यात ७३.८४ टक्के वार्षिक सरासरीच्या पाऊस झाला आहे. जिल्ह्यात यंदा नांदेड तालुक्यात सर्वाधिक चार वेळा अतिवृष्टी झाली. तर मुदखेड, अर्धापूर, भोकर, उमरी, कंधार, लोहा, देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव आणि मुखेड तालुक्यात प्रत्येकी एकवेळ अतिवृष्टी म्हणजेच २४ तासांत ६५ मिमीहून अधिक पाऊस झाल्याची नोंद आहे. त्याचवेळी किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर या तालुक्यांत मात्र एकदाही अतिवृष्टीची नोंद झाली नसल्याचे यावर्षीची पावसाची आकडेवारी सांगते.