शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
3
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
4
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
5
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
6
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
7
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
8
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
9
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
10
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
11
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
12
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
13
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
14
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
15
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
16
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
17
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
18
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
19
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
20
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल

लातुरात बाप-लेकीवर झाले एकाच चितेवर अंत्यसंस्कार

By admin | Updated: May 23, 2016 23:48 IST

लातूर/ रेणापूर : उन्हाळ्याची सुट्टी असल्याने आळंदीच्या दर्शनासाठी गेलेल्या सिंधगाव येथील पंडगे व नागिमे कुटुंबावर सोमवारी काळाने घाला

लातूर/ रेणापूर : उन्हाळ्याची सुट्टी असल्याने आळंदीच्या दर्शनासाठी गेलेल्या सिंधगाव येथील पंडगे व नागिमे कुटुंबावर सोमवारी काळाने घाला घातला़ औसा तालुक्यातील आलमला पाटीनजीक पंडगे यांच्या कारला अपघात झाला आणि बाप-लेकीसह मेहुणीचा मृत्यू झाला़ या बाप- लेकीवर लातुरातील मारवाडी स्मशानभूमीत सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले़ या घटनेमुळे पंडगे व नागिमे कुटुंब दु:खसागरात बुडाले आहेत़रेणापूर तालुक्यातील सिंधगाव येथील राजेश पंडगे (४०) हे लातूर तालुक्यातील ममदापूर येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत असून ते लातुरात राहतात़ त्यांना आई- वडिलांसह पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे़ त्यांचे साडू व्यंकट नागिमे हे चाकूर तालुक्यातील महाळंग्रा येथे राहतात़ सध्या उन्हाळ्याची सुट्टी आणि स्वत:ची कार असल्याने कुटुंबासह आळंदी, पंढरपूरचे दर्शन करुन येऊ असे राजेश पंडगे यांनी पत्नी सरिता पंडगे यांना सांगितले़ तेव्हा आपल्याबरोबरच बहीण, भावजी व त्यांच्या मुलांनाही घेऊन जाऊ, असे सरिता पंडगे म्हणाल्या़ देवदर्शनसंदर्भातील माहिती बहीण मिरा नागिमे यांना सांगितली़ त्यांनीही त्यास होकार दिला़त्यामुळे राजेश पंडगे यांच्यासह पत्नी सरिता पंडगे, मुलगा प्रणव पंडगे, मुलगी समृध्दी पंडगे, मेहुणी मिरा व्यंकट नागिमे, राहुल व्यंकट नागिमे आणि तळणी येथील अनुसया उगिले सात जण शुक्रवारी लातूर येथून स्वत:च्या कार (एमएच २४, एएफ ४२३८) मधून आळंदीला निघाले़ तेथील दर्शन घेऊन पंढरपूरचे दर्शन घेतले़ सोमवारी पहाटे त्यांची कार औसा- लातूर रस्त्यावरील आलमला पाटीजवळ पोहोचली असता ट्रॅव्हल्स (एमएच १० एडब्ल्यू ५९७५) शी अपघात झाला़ यात राजेश पंडगे, मुलगी समृध्दी पंडगे आणि मेहुणी मिरा पंडगे यांचा जागीच मृत्यू झाला़ राजेश पंडगे आणि मुलगी समृध्दी पंडगे या बाप- लेकीवर सोमवारी दुपारी लातुरातील मारवाडी स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले, या घटनेमुळे सिंधगाववर शोककळा पसरली आहे़बाबा, ताईने आक्रोश़़़राजेश पंडगे आणि समृध्दी पंडगे यांच्यावर अंत्यसंस्कार करताना मुलगा प्रणव पंडगे याने बाबा, ताई मला सोडून गेले़ जवळ आईही नाही, असे म्हणत आक्रोश करीत होता़ प्रणवचे आजी- आजोबा आपले दु:ख बाजूला ठेवून त्याला सावरण्याचा प्रयत्न करीत होते़