शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

१६ कोटी ५८ लाखांचा निधी पडून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2017 00:09 IST

लातूर : घनकचऱ्याचे संकलन, वाहतूक व त्यावरील प्रक्रिया, दोन शौचालय, तीन नागरी वनीकरण कामासाठी लातूर मनपाला १४ व्या वित्त आयोगातून १७ कोटी ५८ लाख ८२ हजार रुपयांचा निधी मिळाला

लातूर : घनकचऱ्याचे संकलन, वाहतूक व त्यावरील प्रक्रिया, दोन शौचालय, तीन नागरी वनीकरण कामासाठी लातूर मनपाला १४ व्या वित्त आयोगातून १७ कोटी ५८ लाख ८२ हजार रुपयांचा निधी मिळाला. या निधीतील १ कोटी रुपये स्वच्छता भारत अभियानाकडे वर्ग केला असून, उर्वरित १६ कोटी ५८ लाख ८२ हजारांचा निधी खर्चाविना पडून आहे. लातूर मनपाला १४ व्या वित्त आयोगातून टप्प्याटप्प्याने निधी मंजूर झाला. घनकचरा व्यवस्थापन आणि त्याचे संकलन करण्यासाठी १० सप्टेंबर २०१५ रोजी पहिल्या टप्प्यात काही निधी मिळाला. त्यानंतर २३ डिसेंबर २०१५ आणि पुन्हा १९ सप्टेंबर २०१६ अशा तीन टप्प्यांत एकूण १७ कोटी ५८ लाख ८२ हजार रुपयांचा निधी लातूर मनपाला मिळाला. १३ व्या वित्त आयोगातूनही २ कोटी ७६ लाखांचा निधी मिळाला. मात्र लातूर प्रशासनाने हा निधी घनकचरा संकलन, वाहतूक व त्यावरील प्रक्रियेसाठी खर्च केला नाही. मनपाच्या शेष फंडातीलच निधी स्वच्छतेच्या कामावर खर्च करण्यात आला. त्यामुळे १७ कोटी ५८ लाख ८२ हजार निधीतील १६ कोटी ५८ लाख ८२ हजारांचा निधी गेल्या ११ महिन्यांपासून पडून आहे. स्वच्छता भारत अभियानाकडे यातील १ कोटीची रक्कम वर्ग केली. मात्र घनकचऱ्याचे व्यवस्थापन केले नाही. प्रस्तुत निधी शासनाकडे परत जाणार नसला, तरी मनपाच्या कोषातच पडून राहिला आहे. त्यामुळे प्रशासनावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एलईडी तसेच स्ट्रेचिंग ग्राऊंड कम्पाऊंडच्या बांधकामाची कामे नियोजित आहेत. सध्या मनपाच्या कोषात २५ कोटी ३० लाख ३४ हजार रक्कम शिल्लक आहे. त्यात १४ व्या वित्त आयोगात मिळालेल्या १७ कोटी ५८ लाख ८२ हजार रुपयांचाही समावेश आहे. यातील फक्त १ कोटीची रक्कम स्वच्छ भारत अभियानाकडे वर्ग झाली आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत काँग्रेस पक्षाचे गटनेते रविशंकर जाधव, रिपाइंचे गटनेते चंद्रकांत चिकटे, महादेव बरूरे, शिवसेनेच्या सुनीता चाळक यांनी या निधीच्या अनुषंगाने प्रशासनाला धारेवर धरले. निधी दडवून का ठेवला गेला? त्यातून घनकचरा व्यवस्थापनाचे काम का केले नाही, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित करून प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. शिल्लक असलेल्या २५ कोटी ३० लाख ३४ हजार रकमेपैकी ४ फेब्रुवारी २०१६ रोजी १ कोटी वर्ग करण्यासंदर्भात ठराव करण्यात आला. २९ मार्च २०१६ रोजी पुन्हा दुसरा ठराव घेण्यात आला. त्यानंतर ३० आॅगस्ट २०१६ रोजी अमृत योजनेकरिता ठराव घेण्यात आला. मात्र प्रत्यक्ष काम केले नसल्याने नगरसेवकांत नाराजी आहे.