शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वित्त आयोगाची कामे धिम्या गतीने

By admin | Updated: November 17, 2016 00:26 IST

बीड १४ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना पहिल्यांदाच शासनाने थेट निधी उपलब्ध करून दिला.

संजय तिपाले बीड१४ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना पहिल्यांदाच शासनाने थेट निधी उपलब्ध करून दिला. मात्र, कामे धिम्या गतीने सुरू असून, आतापर्यंत ५४ कोटी ९० लाख ५२ हजार रुपयांपैकी केवळ २७ कोटी ९ लाख ३५० रुपये खर्च झाले आहेत.जिल्ह्यात १ हजार २३ ग्रा.पं. असून, १४ व्या वित्त आयोगातून पहिल्या टप्प्यात ५४ कोटी ९० लाख ५२ हजार रुपये एवढा निधी मिळाला होता. यातून पाणीपुरवठा, दुरुस्ती देखभाल, जलस्रोत बळकटीकरण, स्वच्छता घनकचरा व्यवस्थापन, डासमुक्त गावासाठी शोषखड्डे, ग्रा.पं., अंगणवाडी इमारत, दिवाबत्ती व इतर दुरुस्ती कामे करावयाची आहेत. ३ लाखांहून अधिक निधी खर्च करण्यासाठी ई-टेंडरिंग प्रक्रिया राबविणे अनिवार्य करण्यात आले आहे. वित्त आयोगातून घसघशीत निधी मिळाल्याने गाव कारभाऱ्यांत समाधान असले तरी निधी करण्यात ग्रा.पं. पिछाडीवरच आहेत. वित्त आयोगाद्वारे जिल्ह्यात ३८४८ कामे मंजूर झाली होती. यामध्ये पाणी पुरवठ्याच्या सर्वाधिक १७४९ कामांचा समावेश आहे. दुष्काळाने होरपळून निघालेल्या जिल्ह्यात पाणीपुरवठ्यासंबंधी कामांवर ग्रामपंचयतींचा भर आहे. यापैकी २३५७ एवढीच कामे पूर्णत्वाकडे गेली असून, १४९१ कामे अपूर्ण आहेत.२७ कोटी ८० लाख ७० हजार ६५० रुपये एवढा निधी हा अखर्चित असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, कामांच्या सद्यस्थितीचा अहवाल पाठविण्यास सर्वच गटविकास अधिकाऱ्यांनी विलंब केला आहे. त्यामुळे त्यांना जि. प. च्या पंचायत विभागाने कारणे दाखवा नोटीसही बजावली असल्याचे सूत्रांनी सांगितले.पाच वर्र्षांत ४५७ कोटींची कामेवित्त आयोगातून पाच वर्षांत तब्बल ४५७ कोटी रुपयांची कामे होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील निधी अखर्चित असतानाच आणखी ७६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.