शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

टंचाई काळातील विंधन विहिरी संथ गतीत

By admin | Updated: April 24, 2015 00:38 IST

सितम सोनवणे, लातूर लातूर जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, टंचाई काळात मंजूर झालेल्या विंधन विहिरींची कामे संथ गतीने होत आहेत. टंचाई काळात या विंधन विहिरी पूर्ण होतील की नाही,

सितम सोनवणे, लातूरलातूर जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, टंचाई काळात मंजूर झालेल्या विंधन विहिरींची कामे संथ गतीने होत आहेत. टंचाई काळात या विंधन विहिरी पूर्ण होतील की नाही, याची खात्री नाही. ३२२ पैकी १५३ विंधन विहिरींचे काम कासवगतीने सुरू आहेत. केवळ १६९ विहिरींची कामे पूर्ण झाली असून, या विहिरींना थोडेबहुत पाणी लागले असून, १२ विंधन विहिरी तर कोरड्याच आहेत.जिल्ह्यातील अनेक गावांत पाणीटंचाई आहे. पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतींच्या शिफारशीनुसार या विंधन विहिरी मंजूर केल्या आहेत. परंतु, टंचाई कक्ष आणि प्रशासन बेफिकीर असल्याने विहिरींच्या कामांना गती नाही. गेल्या तीन महिन्यांत ३२२ पैकी केवळ १६९ विंधन विहिरी पूर्ण झाल्या आहेत. १५३ विंधन विहिरींची कामे अद्याप पूर्ण होणे बाकी आहे. १६९ मधील १२ विंधन विहिरी कोरड्याच आहेत. टंचाई काळात ही उपाययोजना केली असली, तरी ग्रामस्थांच्या घशाला मात्र कोरडच आहे. ग्रामस्थांची भटकंती थांबलेली नाही. एप्रिल महिन्यात कडाक्याचे उन्हं पडत आहे. ४१ अंशांवर तापमानाचा पारा गेला आहे. अशा स्थितीत ग्रामस्थ मात्र पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. इकडे प्रशासन विंधन विहिरींची कामे पूर्ण करण्यास असमर्थ ठरत आहेत. लातूर तालुक्यात २१, औसा ४, निलंगा २३, रेणापूर १३, अहमदपूर ३२, चाकूर २१, शिरुर अनंतपाळ १०, उदगीर २३, देवणी १९, जळकोट तालुक्यात ३ नवीन विंधन विहिरी घेण्यात आल्या़ पाणीटंचाईच्या काळात या विंधन विहिरीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांची पाण्याची व्यवस्था होईल, अशी आशा होती. मात्र ती फोल ठरली आहे. त्यासाठी यांत्रिकी विभागाच्या वतीने यांचे निरीक्षण तसेच हातपंप बसविण्याचे कामे केली जात आहेत़ टंचाई कालावधी संपत येत आहे तरी अजून १५३ नवीन विंधन विहिरींची कामे बाकी आहेत़ एप्रिल महिन्याच्या शेवटचा आठवडा सुरू असून, मे महिन्यात तर टंचाई अधिक भेडसावणार आहे. तरीही टंचाई काळातील विंधन विहिरी पूर्ण न झाल्यामुळे टंचाईचा सामना करावा लागणार आहे.जिल्हाधिकारी यांनी या ३२२ नवीन विंधन विहिरीस मान्यता दिली आहे़ या मान्यतेनुसार जिल्हा परिषदेच्या उपअभियंता यांत्रिकी यांचे कार्यालयाने ग्रामपंचायतींना नवीन विंधन विहिरीचे काम सुरु करण्याचे आदेश दिले आहेत़ याआदेशानुसार ग्रामपंचायतींनी १६९ नवीन विंधन विहीरीचे कामे पूर्ण झाले आहे़ त्यांतील १५७ विंधन विहिरींना पाणी लागले आहे़ तर १२ विंधन विहिरी कोरड्या गेल्या आहेत़ ४यातील ३३ विंधन विहिरीवर हात पंप बसविण्यात आले आहेत़ २० विंधन विहिरीवर विद्युतपंप बसविण्यात आले आहेत़ १६९ विंधन विहिरीची तालुकानिहाय परिस्थिती अशी आहे़ विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना करूनही कामाला गती नाही.