शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा तहसील कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: January 7, 2017 00:08 IST

लातूर : शहर जिल्हा काँगे्रसच्या वतीने शुक्रवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

लातूर : नोटाबंदीनंतर देशात किती काळा पैसा जमा झाला, याबाबत श्वेतपत्रिका काढण्यात यावी. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सहारा व बिर्ला ग्रुप यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप होत आहे, याची नि:पक्ष चौकशी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी शहर जिल्हा काँगे्रसच्या वतीने शुक्रवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.नोटाबंदीनंतर देशात आर्थिक आणिबाणी निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. यावर पंतप्रधानांचे मौन आहे. सर्वसामान्य जनतेवर नोटाबंदीचा परिणाम झाला असताना उपाययोजना आखल्या जात नाहीत. त्याच्या निषेधार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून मोर्चा काढण्यात आला. सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून निघालेला मोर्चा दुपारी १ वाजता तहसील कार्यालयावर पोहोचला. यावेळी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.आंदोलनात पक्ष निरीक्षक ए. पी. बसवराज, जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुनीताताई आरळीकर, तालुका अध्यक्ष दगडूसाहेब पडिले, प्रदेश सचिव अमर खानापुरे, महापौर अ‍ॅड. दीपक सूळ, विक्रम हिप्परकर, अ‍ॅड.त्र्यंबकदास झंवर, एस. आर. देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दत्तात्रेय बनसोडे, संतोष देशमुख, सपना किसवे, रेणा कारखान्याचे अध्यक्ष आबासाहेब पाटील, सर्जेराव मोरे, प्रवीण पाटील, स्मिता खानापुरे, महेश काळे, अल्ताफ शेख, रत्नदीप अजनीकर, बिरबल देवकते, नेताजी बादाडे, दगडूप्पा मिटकरी, दत्ता मस्के, राजू आकनगिरे, समद पटेल, सिंकदर पटेल, रमेशप्पा हलकुडे, चंद्रकांत धायगुडे, पृथ्वीराज सिरसाठ, केशरबाई महापुरे, उषा कांबळे, डॉ. विजय अजनीकर, बालासाहेब देशमुख आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)