पाथरी: धनगर समाजाचा अनुसूचित जाती-जमातीमध्ये समावेश करुन आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी ३१ जुलै रोजी दुपारी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर समाज कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. राज्य शासनाने धनगर समाजाच्या मागण्याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे ३१ जुलै रोजी धनगर समाज कृती समितीच्या वतीने बळवंत वाचनालयापासून उपजिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये धनगर समाजाच्या वेशभूषामध्ये महिला, नागरिक सहभागी झाले होते. तसेच या मोर्चामध्ये मेंढ्याचाही समावेश करण्यात आला होता. मोर्चात उद्धव श्रावणे, लक्ष्मण दुगाने, शिवाजी पितळे, ज्ञानेश्वर नेमाने, राधाकिशन डुकरे, नारायण पितळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. मोर्चेकऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. धनगर समाजाच्या या मोर्चामध्ये शिवसेना आ.मीराताई रेंगे, सुरेश ढगे, रविंद्र धर्मे, मुंजाभाऊ कोल्हे, राहुल पाटील, संजय कुलकर्णी आदी सहभागी झाले होते. (वार्ताहर)
धनगर समाजाचा आरक्षणासाठी मोर्चा
By admin | Updated: August 1, 2014 00:24 IST