शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

फ्रेन्डशीप क्लब म्हणजे लूटीचा ‘बाजार’ं

By admin | Updated: May 3, 2015 00:59 IST

सितम सोनवणे, लातूर महिला, मुलींसोबत मैत्री करा, मिटींग करुन रोज हजारो कमवा, अशा जाहिरातीला भुलून पैसे भरुन लातुरातील अनेकजण गंडवले गेले आहेत.

सितम सोनवणे, लातूरमहिला, मुलींसोबत मैत्री करा, मिटींग करुन रोज हजारो कमवा, अशा जाहिरातीला भुलून पैसे भरुन लातुरातील अनेकजण गंडवले गेले आहेत. अशा क्लबच्या नावाखाली भावनाशील तरुणाईला लुटणाऱ्या अक्षरश: टोळ्या कार्यरत आहेत. लातुरातील आणखी तरुण अशा प्रलोभनाला भुलून फ्रेंडशिप क्लबच्या नावाखाली मैत्रीचा बाजार मांडून अनेकांची आर्थिक लूट करणाऱ्या टोळीची शिकार बनता कामा नये म्हणून ‘लोकमत’टीमने याचे स्टिंग आॅपरेशन करुन केलेला पर्दाफाश. सोबत तरुणाईला ‘लोकमत’चे आवाहनही की अशा अनिष्ठ बाबीला भुलू नका. या फ्रेंडशिप क्लबच्या प्रकरणात लातुरातील अनेकांना गंडा घातल्याचे पुढे आले आहे. पण अडचण अशी आहे की कुणीच तक्रार करायला धजावत नाही. कारण ‘हाईप्रोफाईल, महिला आणि मुलींशी आम्हाला फ्रेंडशिप करायची होती’ हे बदनामी होईल या भितीने सांगणे कठीण होऊन बसते आहे. लातूर शहरातील विविध महाविद्यालयातील मुले याला बळी पडली आहेत. वसतिगृहांनी याच्या चर्चा चवीने चर्चिल्या गेल्या. एक शासकीय सेवेतील वैद्यकीय अधिकारी, नुकताच प्रशासनात लागलेला एकटा राहणारा तरुण, एक वकील अशी लांबलचक यादी आहे. फसवणूक झाल्याची जिल्ह्यात एकही तक्रार पोलिसात दाखल झाली नाही़ बदनामीमुळे सारे गप्प आहेत़ मात्र याबाबत ‘लोकमत’कडे तक्रार करण्याचे धाडस एकाने केले आणि ‘लोकमत’ने ही बाब चव्हाट्यावर आणायचे ठरवून हे स्टिंग आॅपरेशन केले़ प्रतिनिधी : मॅडम लातूरहून बोलतोय़़़संवादिका : हां, बोला़़़प्रतिनिधी : मला आपल्या मैत्री क्लबच मेंबर व्हायचयंसंवादिका : मैत्री क्लबच मेंबर होऊन एन्जॉयमेंट करायचीय की पैसा कमवायचं ? पैसे कमवायचं असल्यास मॅडमचे मिस्टर बाहेरगावी गेल्यास त्यांच्यासोबत एन्जॉयमेंट करुन झाले की, मॅडम १० हजार देतील त्यातील ३ हजार आमचं कमिशन असेल, ७ हजार तुमच्यासाठी असतील, यासाठी अडीच हजार रुपये तुम्हाला बँकेत भरावे लागतील़ प्रतिनिधी : (दोन तासाच्या प्रतिक्षेनंतर) मॅडम दोनच हजार रुपये जमा झालेत, ५०० रुपये नाहीत़ संवादिका : ठिक आहे़ २ हजार रुपये बँकेत भरा, ५०० रुपये तुमची मिटींग झाल्यानंतर जमा करा़ बँकेत जाताच मला कॉल करा, अकाऊंट नंबर सांगते़ प्रतिनिधी : (बँकेजवळ जावून) मॅडम मी बँकेत आलोय़संवादिका : ठिक आहे़ अकाऊंट नंबर घ्या, ६०६९१०३१०००३१०९ बँक आॅफ इंडियाच्या कुठल्याही शाखेतून पैसे भरा. प्रतिनिधी : मॅडम, तुम्ही सांगितलेल्या अकाऊंटवर पैसे जमा केले़ (या अकाऊंट बद्दल बँक अधिकाऱ्याला माहिती विचारली असता, हे अकाऊंट आकाश गर्ग यांच्या नावावर असून, उत्तम नगर, नवीन दिल्ली असा पत्ता सांगितला गेला)प्रतिनिधी : हां नमस्कार मॅडम. महिला : नमस्कार. तुम्ही पैसे भरला नाहीत ? प्रतिनिधी : नाही मॅडम बँकेत जाईपर्यंत बँक बंद झाली. महिला : मग एम. पेसाच्या मिनिस्टोअरमधून चार हजार रुपयांचं चोक-अप करायचं. प्रतिनिधी : मला माहित नव्हतं मॅडम ? ते कसं करायचं ? महिला : बस स्टँडसमोर आहेत़ नंदी स्टॉपला आहेत़ अशोक हॉटेल आहे ना, त्याच्या बाजूलाही मिनीस्टोअर आहे व्होडाफोनचे़ कुठेही प्रत्येक ठिकाणी आहे़ रिचार्जवाल्यांकडं असतं़ मिनीस्टोअरमध्ये असतं़ त्यांना सांगा ४ हजार रुपयांचं चोक-अप करा एम-पेसाने़ ते पण बँक अकाऊंटला जातंय़ उद्या बँक बंद आहे़ उद्यापण तुमचं काम रद्द होईल, म्हणून म्हणायले़़़प्रतिनिधी : मी उद्या स्टोअरजवळ गेल्यानंतर फोन करतो़ मग मला प्रोसेस सांगा, कसं करायचे ते़ उद्या करुयात दुपारपर्यंत़ मला दोन्ही पॅकेज अजून एकदा समजून सांगता का?महिला : हो़ एन्जॉयचं एक आणि दुसरं इन्कमचं़ ३ हजार रुपये एकदाच भरले की फ्री एन्जॉयमेंट ६ महिन्यासाठी राहणाऱ देणंघेणं काही नाही़ इन्कम काही नाही़ एन्जॉयमेंटसोबत इन्कम पाहिजे असल्यास २२५० रुपये़ ३ हजार रुपये भरल्यास कॉलेजगर्ल, मॉडेल देवू़ फ्री एन्जॉयमेंट राहील ६ महिन्यापर्यंत़़़प्रतिनिधी : त्यांना काही द्यावं लागतं का?समन्वयिका : नाही़ नाही़़़ पैसे भरले की १०-१५ मिनिटात़ आम्ही तुम्हाला मोबाईल नंबर देऊ. कारण की त्याचं कमिशन-बिमिशान काही नसतं आमचं़ ठीक आहे?प्रतिनिधी : त्यांना पुन्हा कधी भेटता येईल ? समन्वयिका :ते त्यांच्या मनावऱ तुम्ही त्यांना कधीही भेटू शकता. प्रतिनिधी : मैत्रीचा मेंबर बदलूनही मिळेल का?समन्वयिका : हो, हो !प्रतिनिधी : मी उद्याच उर्वरीत पैैसे भरतो तुमचे़़़समन्वयिका : हो, हो चालेल़़़प्रतिनिधी : पिंकी मॅडम, पुनम मॅडम ५ हजार रुपये मागतात़ संवादिका : मी मॅडमशी बोलून तुम्हाला फोन करते़प्रतिनिधी : हां मॅडम, काय झाल़ संवादिका : मागच्या वेळी जरा प्रॉब्लेम झाला होता़ त्यामुळे त्या ५ हजार मागतात़ ते पण कंपनीच्या अकाऊंटला जमा करा़ प्रतिनिधी : मॅडम, पैसे नाहीत, कसे करु़संवादिका : व्याजानी घ्या, दोन तासाचा तरी प्रश्न आहे़ दोन तासानंतर तुम्ही १५ हजार कमवणार आहात़ प्रतिनिधी : मॅडम कसं शक्य आहे, ५०० रुपयाचा डिस्काऊंट मागितला होता़ आणि आज बँकाही बंद आहेत़ संवादिका : लातुरात मनी ट्रान्सफरच्या सुविधा कुठे आहेत ते बघून मला फोन करा़ तुमच्यासाठी आजच मिटींग फिक्स करते़ प्रतिनिधी : (एक दिवसानंतर) मॅडम, तीनच हजार रुपये जमा झालेत, काय करु़संवादिका : ठिक आहे, मी तुम्हाला मदत करते़ माझ्याकडे २ हजार आहेत़ तुम्ही ३ हजार अकाऊंटला जमा करा, पुनम मॅडमला ५ हजार भरल्याचे सांगा़ किती लवकर भराल बँकेत, आज शनिवार आहे, १२़३० पर्यंतच बँका चालू असतात़प्रतिनिधी : ठिक आहे मॅडम १२ पर्यंत भरतो़ पण पुनम मॅडम अजून पैसे तर मागणार नाहीत ना. संवादिका : (लाडीक हसून) नाही नाही. तुम्ही आधी तेवढे भरा. ओ. के.