शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

९८ कोटी रुपयांच्या कर्जासाठी शुक्रवारी सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 01:13 IST

भूमिगत गटार योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी महापालिकेला ९८ कोटी रुपयांची गरज आहे. यासाठी कर्ज उभारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेला दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भूमिगत गटार योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी महापालिकेला ९८ कोटी रुपयांची गरज आहे. यासाठी कर्ज उभारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेला दिला आहे. २६ डिसेंबरपासून तीनवेळा सभा तहकूब करावी लागली. प्रत्येक सभेत कर्ज घेण्यासाठी नगरसेवकांकडून विरोध होत आहे. ८ फेब्रुवारी रोजी सभा घेण्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी जाहीर केले होते. आता यात बदल करून शुक्रवार ९ फेब्रुवारी रोजी सभा घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.भूमिगत गटार योजनेसाठी कर्ज घेण्यात येऊ नये म्हणून भाजप, एमआयएम, काँग्रेस आणि सेनेतील काही नगरसेवकांनी विरोध दर्शविला आहे. विरोधकांपेक्षा आपल्याच पक्षातील काही नगरसेवकांनी विरोध दर्शविल्याने महापौर नंदकुमार घोडेले संकटात सापडले आहेत. आतापर्यंत महापालिका प्रशासनाने या ठरावामागे आपली भूमिका मांडलेली नाही. मागील सर्वसाधारण सभेत प्रोजेक्टरवर संपूर्ण योजना समजावून सांगण्यात येणार होती. नगरसेवकांचा मूड लक्षात घेऊन योजनेची माहिती देण्यात आली नाही. ९ फेब्रुवारी रोजी होणा-या सभेत आयुक्त डी.एम. मुगळीकर भूमिगत योजनेसाठी कर्ज का आवश्यक आहे, याची भूमिका स्पष्ट करणार आहेत. कर्ज न घेतल्यास २६५ कोटी रुपयांचा खर्च पाण्यात जाण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या तिजोरीतून एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम अदा करता येणार नाही. त्यासाठी कर्जरोखे उभारण्यात येतील. कर्ज उभारण्यास स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांनीही पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे महापौरांची अडचण काहीअंशी कमी होणार आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता सभेला सुरुवात होणार असून, या सभेत कर्ज घेण्याचा निर्णय अंतिम होईल.