शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

चार भिंतीच्या वर्गातून मुक्त, आता आयुष्याचा उत्तरार्धही लोककलेच्या प्रसारासाठीच: दिलीप महालिंगे

By प्रशांत तेलवाडकर | Updated: March 3, 2023 20:00 IST

माजी विद्यार्थ्यांकडून ‘लाडक्या प्राध्यापका’वर स्नेहाचा वर्षाव; रंगमंचावर साकारलेल्या गावातील वडाच्या झाडाखालील पारावर प्रा. दिलीप महालिंगे यांची प्रा. ऋषिकेश कांबळे आणि प्रा. सुनील पाटील यांनी मुलाखत घेतली

छत्रपती संभाजीनगर : आता चार भिंतींच्या वर्गातून मी मुक्त झालो आहे... माझ्या उर्वरित आयुष्याचे लक्ष्य आता नाट्यक्षेत्राला आणि विद्यार्थ्यांमधील दडलेल्या कलाकारांना जागविणे व त्यांना अभिनयाच्या क्षेत्रात उंच शिखरावर पोहोचविणे हेच राहणार आहे. यामुळे कलाकार जमवायचे, नाटक, एकांकिका बसवायच्या आणि ते दाखवत गावोगाव मनसोक्त भटकायचे. लोककलेचा प्रसार-प्रचार करायचा, असे आयुष्यातील उत्तरार्धातील नियोजन सेवानिवृत्त प्रा. दिलीप महालिंगे यांनी सांगितले. यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपल्या ‘लाडक्या प्राध्यापका’वर स्नेहाचा वर्षाव केला. एखादा प्राध्यापक सेवानिवृत्त होत असताना मागील ३० वर्षांतील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन त्यांच्या कृतज्ञतेसाठी आठवडाभरात ‘ऋणानुबंध’ व ‘जागर माणूसपणाचा’ असे दोन कार्यक्रम घेण्याची बहुतेक राज्यातील पहिलीच वेळ असेल. असे हे भाग्यवान प्राध्यापक म्हणजे विवेकानंद महाविद्यालयातील प्रा. दिलीप महालिंगे आहेत. २८ फेब्रुवारीला ते सेवानिवृत्त झाले.

महाकवी वामनदादा कर्डक यांचे सान्निध्य लाभलेले प्रा. महालिंगे सरांनी मागील ३५ वर्षांत हजारो विद्यार्थांना ज्ञानदान दिले, शेकडो कलाकार घडविले, त्या माजी विद्यार्थांनी मिळून स्वखर्चातून कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे, महालिंगे सरांनी गॅदरिंग असो, युथ फेस्टिव्हल असो, त्यानिमित्ताने बसविलेल्या एकांकिका, प्रहसन, मूक अभिनय, लावणी, वगनाट्य माजी विद्यार्थ्यांनी तेवढ्याच ताकदीने यावेळी सादर केले. दोन्ही कार्यक्रमांत तापडिया नाट्यमंदिर हाऊसफुल्ल होते. मुख्य प्रवेशद्वारापासूनच हलगीच्या जोरदार वादन व विद्यार्थ्यांनी नृत्य करून जल्लोष केला. स्टेजवर साकारलेल्या पारावर बसून प्रा. महालिंगे यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या ते त्यांचे मित्र प्रा. ऋषिकेश कांबळे व प्रा. सुनील पाटील यांनी. ज्यांनी आपल्यावर वडिलांसारखे प्रेम केले, नाट्यक्षेत्रातील ‘अ, ब, क, ड’ शिकविले, त्या प्रा. महालिंगे सरांमधील ‘माणूसकी’चे विविध पैलू या गप्पांमधून नव्याने समोर आले.

तृतीयपंथींना नायक बनविलेया देशातील पुरुष व स्त्री राज्यकर्ते म्हणून निष्क्रिय ठरले. यामुळे आता तृतीयपंथींच्या हातात सत्ता द्या, ते देश चांगला चालवतील, कारण, भ्रष्ट्राचार करून नेत्यांचे पोट पुढे येतात; पण तृतीयपंथीच्या पुढे कोणी नाही आणि पाठीमागेही कोणी नाही, त्यामुळे पोट पुढे यायचे कारण नाही. मग ते राजकारण जनतेसाठीच करणार, अशा क्रांतिकारक विचारांची ‘लोकतंत्र हाय हाय’ ही एकांकिका बसविली. ती एकांकिका युथ फेस्टिव्हलच नव्हे तर देशपातळीवर गाजली. यात खऱ्या अर्थाने तृतीयपंथींना ‘नायक’ केले, असेही प्रा. महालिंगे यांनी आवर्जून नमूद केले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcultureसांस्कृतिकDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद