शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. अभियंत्याची उचलेगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:42 IST

जिल्हा परिषदेच्या अभियंत्याने कामे न करताच कोट्यवधी रुपयांची बिले उचलली असल्याचा खळबळजनक प्रकार स्थायी समितीच्या बैठकीत समोर आला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या अभियंत्याने कामे न करताच कोट्यवधी रुपयांची बिले उचलली असल्याचा खळबळजनक प्रकार स्थायी समितीच्या बैठकीत समोर आला. वैजापूर आणि कन्नड तालुक्यात आरोग्य उपकेंद्र आणि रस्त्यांची कामे न करतादेखील मोजमाप पुस्तिकेत नोंदी घेऊन बिले उचलली. विशेष म्हणजे, यातील एक अभियंता तर जिल्हा परिषदेची नोकरी सोडून सार्वजनिक बांधकाम विभागात रुजू झाला आहे.जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवारी स्थायी समितीची बैठक झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, सभेच्या पदसिद्ध सचिव मंजूषा कापसे, सभापती विलास भुमरे, मीनाताई शेळके, केशव तायडे, सदस्य मधुकर वालतुरे, अविनाश गलांडे, किशोर बलांडे, पंकज ठोंबरे, रमेश गायकवाड, रमेश बोरनारे आदी उपस्थित होते. यावेळी पंकज ठोंबरे यांनी विषय मांडला की, वैजापूर तालुक्यातील पुरणगाव, कन्नड तालुक्यातील कुंजखेडा, शिवराई आणि औरंगाबाद तालुक्यातील लामकाना उपकेंद्राच्या तसेच औराळा येथील कर्मचारी निवासस्थानाच्या दुरुस्तीसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत (एनआरएचएम) २०१४ मध्ये निविदा जाहीर झाली होती. हेमंत खंडागळे या कंत्राटदारास दुरुस्तीची कामे देण्यात आली. ही चारही कामे प्रत्येकी १ कोटी रुपयांची होती. तथापि, कंत्राटदाराने दुरुस्तीची कामे न करता चारही कामांचे जवळपास १ कोटी रुपयांचे चालू बिल (आरए) उचलले आहे. त्यानंतर आजपर्यंत त्याठिकाणी कामे झालेली नाहीत.‘एनआरएचएम’च्या कनिष्ठ अभियंत्याने कंत्राटदारास चालू बिल देण्यासाठी चुकीच्या नोंदी मोजमाप पुस्तिकेत केल्या आणि त्याने नोकरीचा राजीनामा दिला आहे. सध्या तो सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत आहे. जिल्हा परिषद तसेच शासनाची फसवणूक करणा-या कंत्राटदार आणि कनिष्ठ अभियंत्याविरुद्ध कारवाई करावी, या दोघांकडूनही उचललेली रक्कम व्याजासहित वसूल करावी, असा ठराव या बैठकीत ठोंबरे यांनी मांडला. तेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांना दिले. त्यानुसार डॉ. खतगावकर यांनी सभागृहासमोर सांगितले की, या प्रकरणाची चौकशी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाकडून केली जाईल तसेच सदरील कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.