शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

(चौकट) ३७ जणांना नाही लढता येणार निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:05 IST

पैठण तालुक्यातील प्रकार : निवडणुकीतील खर्चाचा तपशील सादर न करणे पडले महागात ------ ग्रा.पं. उमेदवारांना असा करता येतो खर्च ...

पैठण तालुक्यातील प्रकार : निवडणुकीतील खर्चाचा तपशील सादर न करणे पडले महागात

------

ग्रा.पं. उमेदवारांना असा करता येतो खर्च

ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्यांना किती खर्च करता येईल हे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार सात व नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत २५ हजारांची मर्यादा ठरवून दिली आहे. तर ११ ते १३ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीच्या प्रत्येक सदस्याला ३५ हजारांची खर्च मर्यादा देण्यात आली आहे. तसेच ज्या ग्रामपंचायतीची सदस्य संख्या १५ ते १७ आहे. अशा ठिकाणी निवडणूक कालावधीत उमेदवारांना ५० हजारापर्यंत खर्च करता येतो.

----------

निवडणूक खर्च सादर न करणाऱ्यांचे उमेदवारी अर्ज बाद

पाचवर्षांपूर्वी झालेल्या पैठण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा तपशील सादर केला नाही, अशा उमेदवारांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारी दाखल केली. तर त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात येईल.- चंद्रकांत शेळके, तहसीलदार.

-------

सहा वर्ष होईल निवडणुकीवर बंदी

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यापासून निकाल लागेपर्यंतचा सर्व खर्च विजयी व पराभूत उमेदवारांना देणे निवडणूक आयोगाने बंधनकारक केले आहे. कोणत्या बाबीसाठी किती खर्च झाला. याची सविस्तर माहिती देणे गरजेचे आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तीस दिवसांच्या आत खर्च देणे बंधनकारक आहे. उमेदवारांना निवडणूक खर्च जमा करण्यासंदर्भात सूचना दिल्या जात आहेत. दिलेल्या मुदतीत जर खर्चाचा तपशील जमा केला नाही. तर संबंधितांचे पद रद्द करण्यात येईल. पुढील सहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी करण्यात येईल. म्हणून निवडणूक खर्चाबाबत उमेदवारांनी दक्ष राहावे, असे आवाहन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले आहे.