शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ चौदा शिक्षकांची चौकशी पूर्ण

By admin | Updated: April 11, 2017 00:15 IST

जालना :भरतीचे आदेश नसतानाही जिल्ह्यात १४ शिक्षक भरती केल्याचा ठपका शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांनी ठेवल्याने नियुक्त केलेल्या या शिक्षकांची चौकशी करण्यात आली.

जालना : शिक्षक भरतीची परवानगी नसताना २०१२ मध्ये तत्कालीन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी १४ शिक्षकांची खाजगी हायस्कूलवर नियुक्ती केली होती. भरतीचे आदेश नसतानाही जिल्ह्यात १४ शिक्षक भरती केल्याचा ठपका शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांनी ठेवल्याने नियुक्त केलेल्या या शिक्षकांची चौकशी करण्यात आली. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी पूर्ण झाली आहे. संबंधितांवर शासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.नांदेड, परभणी, हिंगोली, औरंगाबाद आणि जालना येथील खाजगी संस्था आणि शिक्षण विभागाच्या संगनमताने खाजगी हायस्कूलमधील शिक्षकांच्या जागा भरण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे या काळात संपूर्ण राज्यात शिक्षक भरतीवर बंदी होती. याला न जुमानता शिक्षण संस्थाचालकांनी शिक्षकांची भरती करण्यात आली होती. जिल्ह्यात आधीच मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरीक्त ठरले होते. शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांनी १३ फेब्रुवारी २०१७ रोजी माध्यमिक शिक्षण विभागाला पत्र लिहून संबंधित शिक्षकांची चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार शिक्षणाधिकारी रमेश तांगडे यांनी चौदा शिक्षकांची चौकशी पूर्ण करून त्यांची सुनावणी पूर्ण झाली असल्याचे सांगितले. या संपूर्ण प्रकरणावर शासन काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून असल्याचे शिक्षणाधिकारी तांगडे यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. (प्रतिनिधी)