शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नवनगरातील सात गावांत चारपट वाढ

By admin | Updated: January 2, 2015 00:49 IST

औरंगाबाद : शेंद्रा एमआयडीसीलगतच्या नवनगरातील नऊपैकी सात गावांच्या रेडीरेकनरच्या दरात शासनाने जबर वाढ केली आहे. येथील जमिनींचा शासकीय दर १२ लाखांवरून ५० लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आला आहे.

औरंगाबाद : शेंद्रा एमआयडीसीलगतच्या नवनगरातील नऊपैकी सात गावांच्या रेडीरेकनरच्या दरात शासनाने जबर वाढ केली आहे. येथील जमिनींचा शासकीय दर १२ लाखांवरून ५० लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आला आहे. रेडीरेकनरमधील ही वाढ तब्बल चारपट आहे. नवनगरातील कुंभेफळ आणि शेंद्रा ही दोन गावे गतवर्षी प्रभाव क्षेत्रात आली होती. त्यामुळे चालू वर्षी नवनगरातील लाडगाव, शेंद्राबन, वरुड काझी, गंगापूर जहांगीर, करमाड, हिवरा आणि टोणगाव ही सात गावेही प्रभाव क्षेत्रात आणण्यात आली आहेत. त्यामुळे या गावांच्या रेडीरेकनर दरात ३०० ते ५०० टक्के वाढ झाली आहे. गतवर्षी या गावांमध्ये शेतजमिनीचे प्रतिहेक्टरी दर ११ लाख ३९ हजार ते १५ लाख रुपये यादरम्यान होते. यंदा लाडगाव येथे प्रतिहेक्टरी दर ३३ लाख रुपये करण्यात आला आहे. राज्य रस्त्यावर हाच दर प्रतिहेक्टरी ७० लाख रुपये निश्चित करण्यात आला आहे. शेंद्रा बन येथे प्रतिहेक्टरी दर ५७ लाख रुपये, तर बिनशेती संभाव्य दर ७९ लाख रुपये लागू करण्यात आला आहे. वरुड काझी आणि गंगापूर जहांगीर येथे हाच दर प्रतिहेक्टरी ३२ लाख आहे. करमाड येथे प्रतिहेक्टरी ४२ लाख आणि हिवरा येथे प्रतिहेक्टरी २७ लाख रुपये याप्रमाणे शासकीय दर निश्चित करण्यात आला आहे. करमाड येथेच रस्त्यालगतच्या जमिनीचा दर ७७ लाख रुपये प्रतिहेक्टरी निश्चित करण्यात आला आहे. टोणगाव येथे प्रतिहेक्टरी २९ लाख रुपये दर लागू केला आहे. कुंभेफळ आणि शेंद्रा या दोन गावांमधील रेडीरेकनरच्या दरात गतवर्षी ४० टक्क्यांहून अधिक वाढ करण्यात आली होती. या वाढीला अनेकांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे यंदा या दोन गावांच्या शासकीय दरात मात्र, कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.