शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
2
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
3
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
4
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
5
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
6
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
7
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
10
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
11
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
12
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
13
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
14
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
15
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
16
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
17
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
18
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
19
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
20
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
Daily Top 2Weekly Top 5

चार हजार मोरांचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: February 15, 2015 00:44 IST

विलास भोसले , पाटोदा देशातील एकमेव मयूर अभयारण्य नायगाव (ता. पाटोदा) येथे आहे. मात्र, नायगावची अभयारण्याची ओळखच पुसते काय ? अशी भीती निर्माण झाली आहे.

विलास भोसले , पाटोदादेशातील एकमेव मयूर अभयारण्य नायगाव (ता. पाटोदा) येथे आहे. मात्र, नायगावची अभयारण्याची ओळखच पुसते काय ? अशी भीती निर्माण झाली आहे. अभयारण्यातील मोरांसाठी चारा, पाण्याची सोेयच नसल्याने मोरांचा जगण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुष्काळाने केवळ माणसांनाच छळले आहे असे नाही तर पक्ष्यांचेही हाल सुरू आहेत.या अभयारण्याचा कारभार पैठण व औरंगाबाद येथील वन कार्यालयातून चालतो. त्यामुळे कारभार रामभरोसे आहे. एक वनक्षेत्रपाल व तीन वनरक्षक इतका कर्मचारी वर्ग आहे. पैकी वनरक्षकाचे एक पद रिक्त आहे. कर्मचारी अभयारण्यात २४ तास उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र, ते चार-चार दिवस फिरकत नाहीत. मोरांना पाणी, चारा आहे की नाही ? हे ही जाणून घेण्याची तसदी ते घेत नाहीत. त्यामुळे मोरांचे अस्तित्वच धोक्यात आल्याची कैफियत पक्षीमित्र सिध्दार्थ सोनवणे यांनी व्यक्त केली.सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजीव मिसाळ म्हणाले, मोरांबरोबरच अभयारण्यातील इतर प्राण्यांबाबत प्रशासन उदासिन आहे. राष्ट्रीय पक्षाचे जीवन उध्दवस्त होत असताना प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. वनक्षेत्रापाल जी. एन. कांबळे म्हणाले, पाणी, खाद्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठविला आहे. वरिष्ठांनाही या संदर्भात कळविले आहे.अभयारण्यात ग्लेरेसिडीया ही विदेशी झाडे जास्त आहेत.४उन्हाळ्यात पानगळ झाल्यानंतर उष्णता वाढते. परिणामी प्रजनन क्षमता कमी होते.४सीताफळ, करवंद, लिंब, पिंपळ, वड अशी स्वदेशी झाडे वाढली पाहिजेत.४गतवर्षी अभयारण्यात साडेचार हजारावर मोर होते.४जानेवारी २०१५ मध्ये केलेल्या वन्यजीव गणनेनुसार केवळ चार हजार मोर शिल्लक आहेत.वनाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मोरांना चारा, पाणी मिळत नाही. दोन वर्षांपूर्वी दुष्काळात पाणवठे, कुंड्या तयार केल्या. परंतु आता त्या फुटल्या आहेत. त्यामुळे त्यात पाणी साचत नाही. विदेशी झाडांमुळे मोरांना चारा मिळत नाही. त्यामुळे देशी प्रजातीची झाडे वाढवावीत.- सिध्दार्थ सोनवणे, पक्षीमित्र तथा सदस्य, सेन्सिटिव्ह झोन, नायगाव