औसा : सोमवार व मंगळवार या मध्यरात्री नागरसोगा येथे तीन घरफोड्या झाल्या़ यामध्ये जवळपास ७ लाखाचा माल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला़ मोहन मुसाडे यांच्या एकट्याच्या घरातून साडेसहा ते पावणेसात लाख रूपयांचा ऐवज लंपास झाला़ यामध्ये मोबाईल ही चोरीला गेला होता़ औसा नागरसोगा रस्त्यावर चोरट्याने गावापासुन ४ किलोमिटर अंतरावर चोरून नेलेला मोबाईल फ ेकून दिला़ तो बुधवारी दुपारी सापडला़ जर ज्या ठिकाणी मोबाईल सापडला त्याच ठिकाणी चोरट्यांनी मद्यप्राशन केल्याचेही खुना आहेत़ पोलीस चोरट्याच्या मागावर असून अद्याप तरी चोरीचे धागेदोरे हाती लागले नसल्याचे स्पष्ट होत आहे़नागरसोगा येथे २३ व २४ जूनच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी तीन घरामध्ये धाडसी चोरी केली़ एका घरात चांदीची चैन, दुसऱ्या घरात साडेबारा हजार रू़ रोख तर तिसऱ्या घरात २० तोळे सोने, ५० तोळे चांदी व ३५ हजार रू रोख असा जवळपास ७ लाखाचा ऐवज लंपास केला़ यामध्ये मोहन मुसांडे यांच्या घरातील सोने चांदी, रोख रक्कमेसह दोन मोबाईल ही लंपास झाले होते़ मंगळवारी सकाळी चोरी ची घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले़ श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले़ पण श्वान पथक व ठसे तज्ञांना ही यश मिळाले नाही़ तिन घरामध्ये चोरीच्या घटना घडल्या पण चोरट्यांनी कुठलाही धागादोरा मागे सोडला नसल्यामुळे पोलीस यंत्रणा ही चक्रावून गेली आहे़धाडसी चोरी ची ही घटना घडल्यानंतर पोलीस उपाधिक्षक अश्विनी शेलार पोलिस निरीक्षक सुनील ओव्हाळ, सपोनि रफिक सय्यद, स्थाग़ुन्हे अन्वेषण शाखेचे पो़नि़मिसाळ यांनी घटना स्थळी भेट देवून पाहणी केली़ तपासा संदर्भात व्युवहरचना केली़ पण अजून ही चोरट्यांचे धागेदोरे लागताना दिसत नाहित़ पोलिसांना मोबाईल मुळे आशा होत्या़ पण मोबाईल फेकून दिल्यामुळे त्या आशा ही आता संपुष्टात आल्या आहेत़(वार्ताहर)पावसाळ्याची सुरूवात होऊनही पाऊस पडत नसल्याने पेरण्या लांबल्या, त्यामुळे भुरट्या चोऱ्या होत आहेत़ भुरट्या चोऱ्या होत असल्या तरी पोलिसांचे झंझट नको म्हणुन अनेक जण पोलिसाकडे जाण्याचे टाळतात़ पण आता चोरटे बिनधास्त पणे मोठ्या चोऱ्याकडे वळले आहेत़ आता पाऊस नाही लवकर पडला तर पुन्हा चोऱ्यांच्या घटना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्यामुळे आता पोलिसांनाच सतर्क रहावे लागणार आहे़
चोरट्यांनी फेकला चार किलोमीटरवर मोबाईल
By admin | Updated: June 27, 2014 00:11 IST