शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

मौजमजेसाठी महिलांची पर्स हिसकावणारे चार चोरटे अटकेत

By admin | Updated: July 9, 2017 00:41 IST

औरंगाबाद : मौजमजा करण्यासाठी महिलांची पर्स आणि मोबाइल हिसकावणाऱ्या चार जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सायबर क्राइम सेलच्या मदतीने अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मौजमजा करण्यासाठी महिलांची पर्स आणि मोबाइल हिसकावणाऱ्या चार जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सायबर क्राइम सेलच्या मदतीने अटक केली. या चोरट्यांनी तापडियानगर आणि दशमेशनगर भागात पादचारी महिलांची पर्स आणि मोबाइल हिसकावून नेल्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून चोरीचे चार मोबाइल आणि गुन्ह्यात वापरलेली मोपेड, मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली.गजानन डिगंबर जानोळे (२७, रा. राजनगर, मुकुंदवाडी), अनिकेत कचरू विधाते (१८, रा. मुकुंदनगर), राहुल बाळू मिसाळ (रा. मुकुंदनगर) आणि अन्य एका विधिसंघर्षग्रस्त मुलाचा आरोपीत समावेश आहे. गत महिन्यात दोन पादचारी महिलांची पर्स हिसकावून नेण्यात आल्याची घटना घडली. या घटनांच्या अनुषंगाने सायबर क्राइम सेलचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर आणि अधिकाऱ्यांनी तंत्रशुद्ध पद्धतीने तपास केला. तेव्हा दोन्ही घटनांच्या वेळी एक मोबाइलधारक तेथे उपस्थित असल्याचे आढळले. हा मोबाइलधारक मुकुंदवाडी परिसरात असल्याची पक्की माहिती त्यांनी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना दिली. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक नंदकुमार भंडारी, साईनाथ महाडिक, फारुख देशमुख, संजय धुमाळ, ओमप्रकाश बनकर, संजय जाधव, चालक ज्ञानेश्वर पवार यांनी तपास करून आरोपी गजानन जानोळे यास त्याच्या घरातून ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने दीड महिन्यापूर्वी एका अल्पवयीन मुलासह तापडियानगर भागात पादचारी महिलेची पर्स हिसकावून दुचाकीने पळून गेल्याची कबुली दिली. त्या गुन्ह्यातील अठरा हजारांचे दोन महागडे मोबाईल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आले. त्यानंतर २ जुलै रोजी आरोपी अनिकेत, राहुल यांच्या मदतीने दशमेशनगरात महिलेची पर्स हिसकावल्याचे सांगितले. महिलेच्या पर्समधील २१ हजार ४०० रुपये किमतीचे दोन मोबाईल, दोन्ही गुन्ह्यात वापरलेली मोपेड व मोटारसायकल जप्त केली. आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.अपहरणाच्या संशयावरून १४ वर्षीय मुलगा ताब्यातबालकाचे अपहरण केल्याच्या संशयावरून १४ वर्षीय मुलाला (विधिसंघर्षग्रस्त) मारहाण करून जिन्सी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री बायजीपुऱ्यात घडली. पोलिसांनी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी घाटीत दाखल केले.ईदच्या दरम्यान एका बालकाचे अपहरण करून त्यास हिमायत बाग परिसरात नेऊन सोडण्यात आले होते. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध जिन्सी ठाण्यात गुन्हा नोंद आहे. शनिवारी सायंकाळीही एका मुलाचे अपहरण केल्याच्या संशयावरून पोलिसांनी अल्पवयीन मुलास पकडून त्यास मारहाण केली. यानंतर ते त्याला सोबत घेऊन ठाण्यात गेले. त्याला बालसुधारगृहात दाखल केले जाईल.