शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

बीड उपविभागातील ५ पैकी ४ पोलीस ठाणे ‘लॉकअप’विनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:45 IST

एका आयएसओ मानांकनप्राप्त ठाण्यासह तीन ठाण्यांना ‘लॉकअप’ची सुविधा नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणी आयएसओ करण्यासाठी एकीकडे प्रयत्न सुरू आहेत, तर दुस-या बाजूला एका आयएसओ मानांकनप्राप्त ठाण्यासह तीन ठाण्यांना ‘लॉकअप’ची सुविधा नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. केवळ बीड शहर ठाण्यातच ही सुविधा असून, चारही ठाण्याचे आरोपी येथे डांबले जातात. ‘लॉकअप’ (कोठडी) नसल्यामुळे पोलिसांची नजर चुकवून आरोपी पलायन करीत असल्याच्या घटना घडत आहेत.शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून संशयीत आरोपीने पलायन केल्याची घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी सय्यद सलाऊद्दीन सिद्दीकी यांना निलंबीत केले होते. हाच धागा पकडून बीड उपविभागातील ठाण्यांच्या ‘लॉक अप’ चा आढावा घेतला असता, ही माहिती समोर आली. बीड उपविभागात बीड शहर, बीड ग्रामीण, शिवाजीनगर, पेठबीड व पिंपळनेर अशी पाच पोलीस ठाणीयेतात.या पाचपैकी केवळ बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये आरोपींना ठेवण्यासाठी ‘लॉकअप’ची सुविधा करण्यात आली आहे. याच ‘लॉकअप’मध्ये इतर सर्व ठाण्यांचे आरोपी ठेवले जातात.वास्तविक पाहता चार ठाण्यांच्या आरोपींची वाढती संख्या लक्षात घेता शहर ठाण्यातील जागा अपुरी पडते; परंतु याकडे दुर्लक्ष करीत नाइलाजास्तव शहर ठाण्यात आरोपींना डांबणे भाग पडत आहे. त्यामुळे आरोपींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच आरोपींवर नजर ठेवणेही कर्मचा-यांसाठी जिकिरीचे बनत असून, वेळप्रसंगी त्यांना निलंबनाच्या कारवाईस बळी पडावे लागते. प्रत्येक ठाण्यात लॉक अपची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज सर्वस्तरातून व्यक्त होत आहे.