शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात चावल्यासह चार जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 00:59 IST

वाळूज एमआयडीसी परिसरात सोमवारी मध्यरात्री दरोडा टाकण्याचा प्रयत्न एमआयडीसी वाळूज पोलीस व गुन्हे शाखेच्या सर्तकतेमुळे फसला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी परिसरात सोमवारी मध्यरात्री दरोडा टाकण्याचा प्रयत्न एमआयडीसी वाळूज पोलीस व गुन्हे शाखेच्या सर्तकतेमुळे फसला. साजापूर परिसरात लपून बसलेल्या कुख्यात चावल्या ऊर्फ नितीन काळेसह तीन अट्टल दरोडेखोरांना पोलिसांनी जेरबंद केले असून, एक दरोडेखोर पसार झाला. या टोळीकडून एअरगनसह घातक शस्त्रास्त्रे व दरोडा टाकण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.चावल्या ऊर्फ नितीन काळे (३०), अमोल भिवसणे (२०), दत्तू पिंपळे (२२), सर्व रा. जोगेश्वरी व नितीन राजपूत (२३, रा. वाळूज) अशी या संशयित दरोडेखोरांची नावे आहेत. त्यांनी दरोडा टाकण्यासाठी आल्याची कबुली दिली. या टोळीचा चावल्या काळे हा म्होरक्या असून, त्यांच्याविरुद्ध वाळूज एमआयडीसी, वाळूज, गंगापूर, वैजापूर, शिल्लेगाव, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, नेवासा आदी पोलीस ठाण्यांत अनेक गुन्हे दाखल आहेत. चावल्या सराईत गुन्हेगार असून तो एमपीडीएखाली स्थानबद्ध असलेल्या धन्या पिंपळे याचा साथीदार आहे. गुन्हे दाखल झाल्यानंतर सासुरवाडीच्या (दहीगावणे, ता. शेवगाव) आश्रयाला जात असल्याची कबुली चावल्याने दिली. विविध गुन्ह्यांत आरोपपत्र दाखल झाल्यानंतर चावल्या हा न्यायालयातही हजर राहत नसल्यामुळे त्याच्याविरुद्ध अटक वारंटही जारी आहे. अंधाराचा फायदा घेऊन सय्यद शरीफ (२७, रा. रांजणगाव) हा दरोडेखोर पळाला. या दरोडेखोरांची अंगझडती घेतली असता पोलिसांना एअरगन, लोखंडी कोयता, धारदार तलवार, सुताची दोरी, लोखंडी गज, मिरची पूड आदी दरोडा टाकण्याचे साहित्य सापडले. पोलीस पथकाने पकडलेले दरोडेखोर रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांच्याविरुद्ध जबरी चोरी, दरोडा आदी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीकडून दरोडे व चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक साबळे यांनी वर्तविली आहे.