शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील चारशे अधिकाऱ्यांवर टांगती तलवार

By admin | Updated: June 28, 2016 00:58 IST

औरंगाबाद : मराठवाड्यात राबविण्यात येत असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्यामुळे १३१ प्रकरणांची विभागीय चौकशी सुरू केली आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात राबविण्यात येत असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्यामुळे १३१ प्रकरणांची विभागीय चौकशी सुरू केली आहे. यामध्ये सुमारे ४०० अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असल्यामुळे या प्रकरणांची अत्यंत बारकाईने तपासणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यात १९७२ साली दुष्काळ पडल्यामुळे वि. स. पागे यांनी रोजगार हमी योजना सुरू केली. रोजगार हमी योजनेमुळे मजुरांच्या हाताला कामे मिळाली. राज्यातील सिंचन व रस्त्यांची कामे या योजनेतून करण्यास सुरुवात झाली. रोजगार हमी योजनेचा गौरव होण्यास आणि दुसरीकडे योजनेत गैरव्यवहार होण्याचे प्रमाणही वाढले. २००४ मध्ये रोजगार हमी योजना केंद्र सरकारने राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना नावाने ही योजना सुरू झाली. २००६ मध्ये रोहयो बंद करून ही योजना राबविण्यात येऊ लागली. मग्रारोहयोअंतर्गत ग्रामपंचायतमार्फत ५० टक्के आणि योजनेमार्फत ५० टक्के कामे करण्यात येऊ लागली. गटविकास अधिकारी, तहसीलदार, उपअभियंता यांना कामे मंजूर करण्याचे अधिकार देण्यात आले. केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे कामे होत नसल्यामुळे या कामांच्या तक्रारी होऊ लागल्या. उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ४० प्रकरणांत चौकशी सुरू आहे. त्याखालोखाल परभणी आणि बीडचा क्रमांक आहे. जिल्हा आणि विभागीय स्तरावरील ही चौकशी असून, यांचा निपटारा करण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे. रोहयोअंतर्गत ९८ प्रकरणांची तर मग्रारोहयोअंतर्गत ३३, अशा १३१ प्रकरणांची विभागीय चौकशी केली जात आहे. यामध्ये मजूर उपस्थिती नसताना कामे पूर्ण झाल्याचे दाखविणे, कुशल काम न करता बिले उचलणे, परस्पर मजुरी हडप करणे, मंजुरी नसतानाही मंजुरी दिल्याचे दाखवून पैसे काढणे, यासह विविध प्रकारांमुळे कामांची चौकशी होत आहे. ४या चौकशीमध्ये गटविकास अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, लेखापाल, हजेरी सहायक आदींचा समावेश आहे.