शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

चार अट्टल घरफोडे पोलिसांच्या जाळ्यात

By admin | Updated: June 26, 2016 00:47 IST

औरंगाबाद : शहर व परिसरात चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या चार अट्टल गुन्हेगारांना गुन्हे शाखा आणि उस्मानपुरा पोलिसांच्या पथकाने अटक केली.

औरंगाबाद : शहर व परिसरात चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या चार अट्टल गुन्हेगारांना गुन्हे शाखा आणि उस्मानपुरा पोलिसांच्या पथकाने अटक केली. आरोपींमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार गुरमितसिंग तारासिंग कल्याणी ऊर्फ टॉम (४३), कर्नलसिंग तारासिंग कल्याणी (२७), अनिल प्रकाश पौळ (२०) व संतोष राजू खरे (१९, रा. सर्व मिलिंदनगर, उस्मानपुरा) यांचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून तब्बल १७० ग्रॅम सोने व चांदीचे भांडे, असा सव्वापाच लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. रेकॉर्डवरील आरोपी टॉम हा चोरीचा ऐवज विक्रीसाठी घेऊन उस्मानपुरा परिसरात येणार असल्याची माहिती खबऱ्याकडून गुन्हे शाखा पोलिसांना समजली. माहिती मिळताच सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या आणि उस्मानपुरा ठाण्याच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी खबऱ्याने सांगितलेल्या ठिकाणी सापळा रचला. तेथे टॉम पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडे त्यावेळी चांदीच्या काही वस्तू आढळून आल्या. ‘खाक्या’ दाखवून विचारपूस करताच टॉमने तोंड उघडले. हा चोरीचा ऐवज असल्याचे त्याने कबूल केले. साथीदार कर्नलसिंग आणि अनिल यांच्या मदतीने काही दिवसांपूर्वी गादिया विहार परिसरातील राजनगर येथील अ‍ॅड. गजेंद्र शिरसीकर यांचे घर फोडून देवपूजेची चांदीची भांडी, तसेच काही सोन्याचे दागिने चोरी केल्याचे त्याने सांगितले. मग पोलिसांनी शोध घेऊन त्याचे साथीदार कर्नलसिंग आणि अनिल या दोघांना अटक केली.तसेच टॉमने अन्य एक साथीदार संतोष खरे याच्यासोबतही गुन्हा केल्याची माहिती दिली होती. त्यावरून उस्मानपुरा पोलिसांनी शनिवारी संतोषला अटक केली. त्याला खाक्या दाखविताच त्यानेही टॉम आणि अजय ठाकूर (रा. सातारा) याच्या मदतीने काही दिवसांपूर्वी श्रेयनगरातील जगदीश मुंदडा यांचे घर फोडून लाखो रुपयांचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली.