मुजीब देवणीकर, औरंगाबादसर्वसामान्य, गोरगरीब आणि हातावर पोट असलेल्या नागरिकांच्या वसाहतींमध्ये मागील काही वर्षांपासून अनधिकृतरीत्या एलपीजी गॅस भरून देण्याचा ‘उद्योग’ सुरू आहे. या अत्यंत धोकादायक उद्योगामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना अक्षरश: मरणयातनाच भोगाव्या लागत आहेत. शहर पोलिसांच्या आशीर्वादाने गुंड प्रवृत्तीचे लोक हा व्यवसाय अत्यंत उघडपणे करीत आहेत. याची तक्रार सर्वसामान्यांनी केली तर उलट त्यालाच ‘धडा’ शिकविण्यात येत आहे.स्फोटाचा धोकाशहरात समतानगर, सिल्लेखाना, हर्सूल, बायजीपुरा येथे चार अनधिकृत ठिकाणी एलपीजी गॅस भरून देण्याचे काम २४ तास सुरू असते. या केंद्रांमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना गॅसच्या दुर्गंधीने श्वास घेणे कठीण होऊन बसले आहे. ज्येष्ठ नागरिकांची नजर कमजोर होणे, लहान मुलांना दर चार दिवसांनी दवाखान्यात न्यावे लागणे आदी अनेक समस्यांना समोरे जावे लागत आहे. ज्या ठिकाणी ही अनधिकृत कामे सुरू आहेत, तेथे मोठा स्फोट झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. विशेष म्हणजे एवढ्या छोट्या गल्ल्यांमध्ये हे चालते की, तेथे अग्निशमन दलाचा बंबही पोहोचू शकत नाही.७ हजार वाहनेशहरात तीन हजारांहून अधिक एलपीजी रिक्षा धावत आहेत. त्यांना लागणारे इंधन अनधिकृत एलपीजी केंद्रांवर अत्यंत स्वस्त दरात मिळत आहे. चार हजार खाजगी चारचाकी वाहनेही एलपीजीवर आहेत. अत्यंत दाट लोकवसाहतींमधील या चार अनधिकृत केंद्रांवर २४ तास वाहनांची रांग लागलेली असते. त्यामुळे आसपासच्या नागरिकांना जीव मुठीत ठेवूनच जगावे लागते. चिकलठाणा, पंढरपूर आणि कामगार चौक, वाळूज येथे एलपीजीचे अधिकृत पंप आहेत. येथे एलपीजी ५१ रुपये ५३ पैसे दराने मिळते तरीही रिक्षाचालक जात नाहीत. कारण अनधिकृत केंद्रावर ५५० रुपये दिले, तर तब्बल १६ लिटर एलपीजी मिळते. अधिकृत पंपावर एवढ्याच एलपीजीसाठी ८२४ रुपये ४८ पैसे द्यावे लागतात.पोलिसांचा आशीर्वादगुन्हे शाखेने यापूर्वी एका केंद्रावर धाड टाकून अॅपेरिक्षा आणि ज्या मशीनद्वारे गॅस भरण्यात येतो ते साहित्य जप्त केले होते. या प्रकरणात एका आरोपीला अटकही करण्यात आली. आजही हा आरोपी त्याच केंद्रावर बसून एलपीजी गॅस विकतोय. पोलीस कारवाईत ज्या गॅस एजन्सीकडून त्याला गॅस मिळत होता, त्या एजन्सीवर अजिबात कारवाई झाली नाही. दरमहा पोलिसांचा ‘उद्देश’ साध्य होत असल्याने उघडपणे हा कुटीरोद्योग राजरोसपणे सुरू आहे. अनधिकृत केंद्रांचा सविस्तर पत्तासमतानगर गल्ली नं. ३ आणि ४ च्या मध्ये एक केंद्र सुरू आहे. त्याचप्रमाणे सिल्लेखाना येथे कुरैशी मशीदच्या पाठीमागे, बायजीपुऱ्यात पाण्याच्या टाकीजवळ, हर्सूल गावाबाहेर पटेलनगर येथेही एक केंद्र सुरू आहे. या सर्व केंद्रचालकांनी मार्केटिंगसाठी चक्क व्हिजिटिंग कार्ड छापले आहेत. कार्ड वाटपासाठी एक स्वतंत्र माणूस रोजंदारीवर ठेवला आहे. या चारही केंद्रांमध्ये व्यावसायिक स्पर्धाही सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.शहरात ज्या ठिकाणी अनधिकृत एलपीजी गॅस भरून मिळत आहे, तेथे अशाच पद्धतीचे मशीन वापरले जात आहे. अवघ्या साडेचार हजार रुपयांमध्ये हे मशीन उपलब्ध होते. या मशीन विक्रीवर कोणतेही बंधन नाही. ही मशीन आॅनलाईन मागविण्याची पद्धत असल्याचे सूत्रांनी सांगितले.रोज किमान २५० सिलिंडर लागतातशहरातील चार केंद्रांवर दररोज २५० सिलिंडर किमान लागतात. हे सिलिंडर पोहोचविण्याचे कामही संबंधित गॅस एजन्सीचे कर्मचारी करतात. समतानगर येथे गल्ली नं. ७ मध्ये तर गॅसचे खास गोडाऊनच तयार करण्यात आले आहे. दिवसातून तीन ते चार वेळेस रिक्षा भरून येथे सिलिंडर येतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात अनधिकृतरीत्या या मंडळींना सिलिंडर मिळतातच कसे? असाही प्रश्न आसपासच्या नागरिकांना पडला आहे.गुन्हे दाखल करणारशहरात चार ठिकाणी अनधिकृत एलपीजी गॅस भरून मिळत असल्याच्या मुद्यावर जिल्हा पुरवठा अधिकारी संजय जाधवर म्हणाले की, आम्हाला याबाबत काहीच कल्पना नाही. अशा पद्धतीने काम होत असेल, तर जीवनावश्यक वस्तू कायद्याप्रमाणे संबंधितांवर गुन्हे दाखल होऊ शकतात. आम्ही लवकरच पाऊल उचलू, असे त्यांनी नमूद केले.दररोज ७७ हजारांची कमाई एका अनधिकृत केंद्रावर दररोज ७० गॅस सिलिंडर खर्च होतात. एका सिलिंडरमध्ये १४ किलो गॅस असतो. सेंटरचालक त्याला ३० लिटरमध्ये रूपांतरित करतो. अवघ्या ४६० रुपयांना खरेदी केलेल्या सिलिंडरमध्ये तो १,१०० रुपये कमवितो.
शहरात चार ‘स्फोटक’ केंदे्र!
By admin | Updated: July 31, 2014 01:25 IST