एकीकडे शासनस्तरावर कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा संघर्ष करण्यासाठी जिल्हाभर पूर्वतयारी हाती घेतली असताना दुसरीकडे मात्र कोविड कर्मचाऱ्यांवर कार्यमुक्तचे आदेश बजावण्यात येत आहे. त्यामुळे सोयगाव तालुक्यासाठी ही चिंतेत भर घालणारी बाब ठरत आहे.
रुग्णसंख्या नसल्याचे कारण
सोयगाव तालुक्यात २४ दिवसांत एकही रुग्ण नसल्याचे कारण पुढे करून जिल्हा परिषदेने या कोविड कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात सोयगाव तालुक्यात सध्या थंडी गायब असल्याने कोरोना संसर्गाची साखळी तुटली असल्याचा आरोग्य विभागाचा अंदाज आहे. मात्र, आठवडाभरात रुग्णसंख्येत वाढ झाल्यास ऐनवेळी कर्मचारी कुठून आणावे, हा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.