शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

चार अपघातांत ४ ठार

By admin | Updated: May 14, 2017 22:57 IST

बीड : जिल्ह्यात मागील २४ तासांत झालेल्या चार वेगवेगळ्या अपघातांत चौघे ठार झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात मागील २४ तासांत झालेल्या चार वेगवेगळ्या अपघातांत चौघे ठार झाले. बीडसह गेवराई, केज व माजलगाव येथे या घटना घडल्या.बीड शहारातून जाणाऱ्या अहमदनगर राज्य रस्त्यावरील एका हॉटेलसमोर कार (क्र. एमएच २३ एडी - ७७७३) च्या धडकेने दुचाकीवरील (क्र. एमएच १२ बीयू- ७१५३) सोमनाथ हिरालाल पिसाळ (४५ रा. शहाजानपूर ता. बीड) हे जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी संजय सोमनाथ पिसाळ यांच्या फिर्यादीवरुन ग्रामीण ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.दुसऱ्या घटनेत माजलगाव तालुक्यातील घळाटवाडी फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मनोरुग्ण युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे ३ च्या सुमारास घडली. सुरेश रामराव संकोळ (३५ रा. तानाजीनगर, माजलगाव) असे मयताचे नाव आहे. तो कोणत्याही वेळी कुठेही फिरत असे. घळाटवाडी फाट्याजवळ त्यास अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. ग्रामीण ठाण्यात अज्ञात वाहनाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोहेकॉ पंडित खोडवे हे करीत आहेत.तिसरी घटना केज - अंबाजोगाई रस्त्यावरील डिघोळफाटा येथे रविवारी घडली. अंबाजोगाईहून केजकडे निघालेल्या जीपने दुचाकी (एमएच २३ डी ६१०८) ला जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील त्रिंबक मरीबा पोटभरे (६५, रा. कोद्री, ता. केज) हे जागीच ठार झाले. युसूफवडगाव ठाण्यात अज्ञात चालकावर गुन्हा नोंद झाला.गेवराई तालुक्यातील रानमळा फाटा येथे वऱ्हाड घेऊन निघालेल्या जीपचे (एमएच १६ एबी १६४८) रविवारी टायर फुटले. त्यानंतर जीप उलटली. यात रामचंद्र राठोड, द्वारका राठोड, ओम राठोड, प्रयागा राठोड, ललिता राठोड (सर्व रा. रूई भारडी, ता. अंबड, जि. जालना) हे पाचजण जखमी झाले. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.