शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक बलात्कारप्रकरणी चौघांना अटक

By admin | Updated: June 25, 2014 01:28 IST

अजिंठा : आमसरीच्या डोंगरात फिरण्यासाठी आलेल्या प्रेमीयुगुलाचे मोबाईलद्वारे अश्लील चित्रीकरण करून तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आमसरी येथील चार तरुणांना मंगळवारी अजिंठा पोलिसांनी अटक केली.

अजिंठा : सिल्लोड तालुक्यातील आमसरीच्या डोंगरात फिरण्यासाठी आलेल्या प्रेमीयुगुलाचे मोबाईलद्वारे अश्लील चित्रीकरण करून तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आमसरी येथील चार तरुणांना मंगळवारी अजिंठा पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील वडगाव एक प्रेमीयुगुल आमसरी येथील महादेव अंबऋषी देवस्थानावर दर्शनासाठी आले होते. देवदर्शनानंतर जवळच्या डोंगरात हे प्रेमीयुगुल फिरण्यासाठी गेले. या दरम्यान आमसरी येथील विजय रमेश तराळ (२०), रामधन पुंडलिक तराळ (२३), गजानन भगवान तराळ (२२) व समाधान गोविंदा काळे (२२) हे चार तरुण त्यांच्या मागावर होते. या चौघांनी डोंगरात फिरताना प्रेमीयुगुलाचे मोबाईलद्वारे गुपचूप अश्लील चित्रीकरण केले. यानंतर प्रेमीयुगुलास गाठून धमकी दिली. आम्ही वन विभागाचे कर्मचारी आहोत, तुम्ही जंगलात काय करीत आहात, तुम्हाला पोलिसांच्या स्वाधीन करावे लागेल, तुमचे लफडे आहे, असे धमकावून दोघांंना मारहाण केली. यातील दोन तरुणांनी तरुणीस ओढत नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तिसऱ्या तरुणाने बलात्काराचे शूटिंग केले, तर चौथ्याने प्रियकरास पकडून ठेवले. ही घटना दि. २५ मे रोजी घडली होती.बदनामीच्या धाकाने प्रेमीयुगुल चूपघडलेल्या भयंकर घटनेने हे प्रेमीयुगूल भयभीत झाले होते; परंतु तक्रार केली तर आपलीच बदनामी होईल म्हणून या हेतूने त्यांनी तक्रार न करता आपले घर गाठले. यानंतर या चार आरोपींनी सदरचे अश्लील चित्रीकरण व्हॉटस् अ‍ॅप व मेलद्वारे मित्रमंडळी व मुलीच्या नातेवाईकांना पाठविले.महिनाभरात खूप चर्चा झाल्याने या घटनेला वाचा फुटली. शेवटी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी धीर देत सोमवारी अजिंठा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करून या चार तरुणांना अटक केली. शूटिंग करणाऱ्या तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्नसामूहिक बलात्काराचे शूटिंग करणाऱ्या तरुणाने पोलिसांच्या धाकाने गेल्या आठवड्यात विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता; पण तो यातून बचावला. तोही पोलिसांच्या ताब्यात आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राम मांडुरके यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास अजिंठ्याचे सपोनि. शंकर शिंदे, फौजदार अनंत जगताप, आर.एन. छत्रे, अजित शेकडे, एस.डी. नवसारे करीत आहेत.