लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जुगारबंदी कायद्याअंतर्गत पोलिसांनी हिंगोली ग्रामीण ठाणे हद्दीत छापा टाकून जुगार खेळणाऱ्या चौघांवर शनिवारी कारवाई केली. जिल्हा पोलीस दलातर्फे जुगारबंदी कायद्याअंतर्गत विविध पोलीस ठाणे हद्दीत कारवाई करण्यात आली. हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत कारवाई करून पोलिसांनी आरोपींकडील जुगार साहित्यासह १ हजार ९५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी रमेश मोतीराम वैद्य, गणेश वैद्य, राजू देवराव लांडगे, बबन सुदामा नेतने यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चालकावर गुन्हा - मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या चालकास हिंगोली शहर पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले. याप्रकरणी सर्जेराव डहाळकेविरूद्ध गुन्हा दाखल झाला.
जुगार खेळणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल
By admin | Updated: June 25, 2017 23:39 IST