शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
4
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
5
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
6
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
7
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
8
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
9
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
10
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
11
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
12
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
13
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
14
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
15
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
16
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
17
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...
18
केंद्र सरकार ५ वर्षांत झाले मालामाल; कमावले दुप्पट, मिळाले २२ लाख कोटी 
19
Mumbai: भांडूप प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, 'त्या' मुलीने आत्महत्या केली नाही तर...
20
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड

लाखोंचा गंडा घालणाऱ्या चीटफंडचे सूत्रधार अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:43 IST

नांदेड: शहरातील श्रीनगर भागात के़विरेन साई चिटफंड प्रा़ लि़ मध्ये पैसे गुंतवणूक केल्यानंतर एका वर्षात दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: शहरातील श्रीनगर भागात के़विरेन साई चिटफंड प्रा़ लि़ मध्ये पैसे गुंतवणूक केल्यानंतर एका वर्षात दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या चिटफंडच्या दोन सूत्रधारांच्या भाग्यनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या़ हैदराबाद येथे हे आरोपी लपून बसले होते़ गेल्या अनेक दिवसांपासून भाग्यनगरचे पोउपनि चंद्रकांत पवार त्यांच्या मागावर होते़ काबरानगर येथील ज्योती केरबा जिंके यांनी २१ मार्च २०१७ रोजी भाग्यनगर पोलीस ठाण्यात त्याबाबत पहिली तक्रार दिली होती़ जिंके यांनी विरेन चिटफंडमध्ये गणेश चंद्रय्या कमटम, मुरली चंद्रय्या कमटम, व्यंकटेश मत्ती, महेश मत्ती, नरेश कमटम, संध्या गणेश कमटम यांनी विश्वासात घेऊन चिटफंडमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले होते़ त्यानुसार जिंके यांनी तीन लाख रुपयांची गुंतवणूक केली़ ही रक्कम एक वर्षात दुप्पट करुन देतो असे आश्वासन संचालक गणेश कमटम याने दिले होते़ दर महिन्याला जिंके यांच्याकडून पैसे जमा करुन घेण्यात आले़ जून २०१६ मध्ये जिंके यांना तीन लाख रुपयांची बीसी लागली़ तेव्हा ही रक्कम न देता पुन्हा दुप्पट करण्याचे आमिष दाखवून त्याबदल्यात अभ्युदय बँकेचा धनादेश जिंके यांना देण्यात आला़ हा धनादेश बँकेत न टाकण्यासही सांगण्यात आले, परंतु याबाबत संशय आल्यानंतर जिंके यांनी पैशाची मागणी केली असता, चिटफंडकडून टाळाटाळ करण्यात येत होती़ त्यानंतर त्यांनी या प्रकरणात भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली़ चौकशीत चिटफंडमध्ये मदन बाळासाहेब राऊत यांनी ७ लाख, दशरथ पांडुरंग गंगातिरे ५० हजार, सुनील शंकरअप्पा धाडे १ लाख, रामा मुंजाजी गच्चे २ लाख ९० हजार, शांताबाई रामा गच्चे ४ लाख अशा प्रकारे जवळपास १८ लाख ४० हजार रुपयांची ठेवीदारांनी गुंतवणूक केल्याचे उघडकीस आले़ त्यानंतर पोलिसांनी मुरली चंद्रय्या कमटम (राफ़रांदेनगर), महेश रामलू मत्ती (रा़दयानंदनगर) यांना पकडले़ सध्या हे दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत़ पोलिसांनी फरार झालेल्या आरोपींच्या बँक खात्यांची माहिती काढली़ त्यावेळी चिटफंडमधील पैसे त्यांनी मित्र आणि नातेवाईकांच्या नावावर गुंतविल्याचे पुढे आले़ तसेच अन्यही काही जणांना अशाच प्रकारे गंडविले असून हा आकडा ७५ लाख १२ हजार ८०० रुपयापर्यंत पोहोचला़ घटनेनंतर फरार आरोपीच्या मागावर पोउपनि चंद्रकांत पवार गेल्या अनेक दिवसांपासून होते़ त्याबाबत माहिती मिळताच या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या़