हिंगोली : औंढा तालुक्यातील पिंपळदरी शिवारामध्ये २१ जुलै रोजी वन विभागाच्या पथकाने छापा टाकून अवैध सागवान पकडले. या प्रकरणी चौकशी करून संबंधितांविरूध्द कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.हिंगोलीचे विभागीय वन अधिकारी चंद्रशेखर सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली फिरत्या पथकाचे प्रमुख वनपरिक्षेत्र अधिकारी कोकितकर, खानापूर चित्ता येथील वन परिमंडळ अधिकारी काळे, वनरक्षक मुदीराज, चोपडे यांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये एक ट्रकभर सागवानाची लाकडे जप्त करण्यात आली असूून हा माल हिंगोली येथील खटकाळी भागातील वनविभागाच्या कार्यालयात आणण्यात आला आहे.या प्रकरणात नेमकी किती जणांवर कायदेशीर कारवाई झाली, याची माहिती मात्र मिळाली नाही. (प्रतिनिधी)
वन विभागाने पिंपळदरी शिवारात अवैध सागवान पकडले
By admin | Updated: July 23, 2014 00:19 IST